• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • हिंजवडी प्रकरण- 'त्या' चिमुरडींवर दोघांकडून नाही चौघांकडून अत्याचार

हिंजवडी प्रकरण- 'त्या' चिमुरडींवर दोघांकडून नाही चौघांकडून अत्याचार

चॉकलेटचे अमिष दाखवून ऊसतोड मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना मागील रविवारी घडली होती

 • Share this:
  पुणे, २५ सप्टेंबर- हिंजवडी जवळ असलेल्या कासारसाई येथील ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघडकीस आली होती, यामध्ये एका पीडितेच्या मृत्युही झाला होता. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र संबंधित प्रकरणात दोघांनी नाही तर चौघांनी मिळून हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री उशीरा आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुमीरन गायकवाड आणि सोमनाथ वाघोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून गणेश निकम याच्यासह आणखी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास यापूर्वी अटक करण्यात आली आहे. चॉकलेटचे अमिष दाखवून ऊसतोड मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना मागील रविवारी घडली होती. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाल्याने बुधवारी या घटनेला वाचा फुटली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी पीडित मुलीकडे आणखी चौकशी केली असता तिने आणखी दोघांची नावे सांगितली आहेत. मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ दोघांना राहत्या घरातून अटक केली. हिंजवडी पोलिस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ तारखेला रविवारच्या दुपारी जेव्हा ही घटना घडली, तेव्हा घटनेतील आरोपी असलेल्या दोन तरुणांनी, मंदिरा बाहेर खेळत असलेल्या दोन १२ वर्षीय मुलींना चॉकलेट देण्याच्या बाहाण्याने निर्जन स्थळी नेले. त्यांच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. त्याचबरोबर, घडला प्रकार कुणाला सांगितला तर पीड़ित मुलींना जीवे मारण्याचीही धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी आधी हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला नव्हता. मात्र, एका मुलीला जास्त रक्तस्त्राव होत असल्याची बाब आईच्या लक्षात आली आणि त्याबाबद तिने मुलींना विचारल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र तो पर्यंत बराच उशीर झाल्यान पीडीत मुलीला वेळेत उपचार मिळू शकले नाही. जेव्हा तिला उपचाररासाठी दाखल करण्यात आले तेव्हा, तिचा मृत्यु झाला. VIDEO : लातूरमध्ये देशातील ड्रोन फार्मिंगचं पाहिलं प्रात्यक्षिक यशस्वी
  First published: