• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पुण्याच्या हिंजवडी भागात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

पुण्याच्या हिंजवडी भागात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

मानसिक धक्क्यानं एका मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

 • Share this:
  पुणे, २० सप्टेंबर- पिंपरी चिंचवड जवळील हिंजवडी आयटीपार्क शेजारी असलेल्या कासारसाइ परिसरात, दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील एका पीड़ित मुलीचा मृत्यु झाला असून, दुसऱ्या मुलीवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारच्या दुपारी जेव्हा ही घटना घडली, तेव्हा घटनेतील आरोपी असलेल्या दोन तरुणांनी,  मंदिरा बाहेर खेळत असलेल्या दोन १२ वर्षीय  मुलींना चॉकलेट देण्याच्या बाहाण्याने निर्जन स्थळी नेले. त्यांच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. त्याचबरोबर, घडला प्रकार कुणाला सांगितला तर पीड़ित मुलींना जीवे मारण्याचीही धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी आधी हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला नव्हता. मात्र, एका मुलीला जास्त रक्तस्त्राव होत असल्याची बाब आईच्या लक्षात आली आणि त्याबाबद तिने मुलींना विचारल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र तो पर्यंत बराच उशीर झाल्यान पीडीत मुलीला वेळेत उपचार मिळू शकले नाही. जेव्हा तिला उपचाररासाठी दाखल करण्यात आले तेव्हा, तिचा मृत्यु झाला. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत, हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणातील दोन्हीही मुख्य आरोपींना तात्काळ अटक केली असून, पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिली आहे. तरूणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसीड, पाहा व्हिडिओ
  First published: