मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फसवणुकीची नवी पद्धत, ‘हॅलो, मसाज करुन द्याल का?’

फसवणुकीची नवी पद्धत, ‘हॅलो, मसाज करुन द्याल का?’

तरुणांच्या तसंच वयस्क पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवून त्यांची फसवणूक करण्याचा नवा प्रकार पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात उघडकीस आला आहे.

तरुणांच्या तसंच वयस्क पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवून त्यांची फसवणूक करण्याचा नवा प्रकार पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात उघडकीस आला आहे.

तरुणांच्या तसंच वयस्क पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवून त्यांची फसवणूक करण्याचा नवा प्रकार पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात उघडकीस आला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 10 जानेवारी : तरुणांच्या तसंच वयस्क पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवून त्यांची फसवणूक करण्याचा नवा प्रकार पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात उघडकीस आला आहे. या भागातील पुरुषांना ‘हाय प्रोफाईल महिलेचा मसाज (Massage) करुन द्याल का?’ अशी विचारणा करणारे फोन येत आहेत. फोनवरुन भावना चाळवल्यानंतर हाय प्रोफाईल   (High Profile) फ्रेंडशिप क्लबची (Friendship Club) मेंबरशिप घेण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे पद्धत?

‘लोकमत’ नं दिलेल्या वृत्तानुसार, “फोनवर सुरुवातीला गोड बोलून समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकण्यात येतो. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव, वय कामाचं ठिकाण, कामाचं स्वरुप ही माहिती घेतली जाते. त्यानंतर अधिक आर्थिक कमाईसाठी त्यांच्यापुढं हायप्रोफाईल महिलांची मसाज करण्याची ऑफर दिली जाते. समोरच्या व्यक्तीनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर पुढच्या भेटीची (Appointment) तारीख ठरवून तो फोन संपतो.

त्यानंतरच्या संभाषणात कोणत्या भागातील महिला ग्राहक आहे, याची माहिती दिली जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा फोन करणाऱ्या महिलेवर विश्वास बसतो. हाय प्रोफाईल महिलेच्या मसाजानंतर चांगले पैसे मिळणार या विचारानं त्यांच्या भावना चाळवतात. अशा प्रकारे फोनवरील ‘सावज’ पूर्णपणे जाळ्यात अडकल्याची खात्री झाल्यानंतर फोन वरील तरुणी फ्रेंडशिप क्लबची ऑफर सांगते. त्यासाठी काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. काही वेळा बँकेचा अकाऊंट नंबरही देण्यात येतो.

पैसे मिळाले, फोन बंद!

पैसे दिल्यानंतर कॉल सेंटरमधील तरुणीचा फोन बंद होतो. आपण फसवले गेले आहोत, हे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. या कामासाठी दिल्ली तसंच बांगलादेशच्या सीमावर्ती परिसरातून काम होते. काम करणाऱ्या तरुणींना वेगवेगळ्या राज्यातील सीमकार्ड दिले जातात.

‘ही मंडळी बनावट नावं आणि बँक खात्यांचा वापर करतात. तसंच ते सीमकार्डही सतत बदलतात. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सहनही होत नाही, सांगताही येत नाही!

फसवणूक करणारी व्यक्ती सामाजिक प्रतिष्ठा, कुटुंबीयांचा दबाव सारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिसांकडे तक्रार देखील करण्यास फारसं पुढे येत नाहीत. या मंडळींची ‘सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही, ’  अशी परिस्थिती असते.

कोणत्याही मोहाला बळी न पडता सतर्क राहणे हाच या प्रकराची फसवणूक टाळण्याचा उपाय असल्याचं पिंपरी-चिंडवड सायबर सेल पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, Pune