मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पतंगाचा मांज्याने तोडला आयुष्याचा दोर, पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पतंगाचा मांज्याने तोडला आयुष्याचा दोर, पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

अथर्व हा वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीवर अडकलेला मांज्या काढण्यासाठी चढला होता.

अथर्व हा वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीवर अडकलेला मांज्या काढण्यासाठी चढला होता.

अथर्व हा वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीवर अडकलेला मांज्या काढण्यासाठी चढला होता.

  • Published by:  sachin Salve
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 20 जानेवारी : पतंगाचा मांज्या एक मुलाच्या जीवावर बेतला. पतंगीचा मांजा काढताना पाण्याच्या टाकीत पडून अकरा वर्षाच्या अथर्व गोरे या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील तुकाई नगर इथं घडली. मृत अथर्व गोरे हा तुकाईनगर मधील वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीवर अडकलेला मांज्या काढण्यासाठी चढला होता. मांजा काढत असताना तो अथर्वचा पायात अडकला आणि तोल जाऊन तो झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. यात त्याचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीला झाकण नाही आणि या ठिकाणी सुरक्षारक्षक ही या नसल्याने अनेक मुले टाकीवर जातात. अथर्व ही त्याच्या भावाबरोबर टाकीवर चढला होतात. त्याच दरम्यान ही घटना घडली.  जर टाकीला झाकण असते किंवा सुरक्षारक्षक जरी असता तर हा आपघात झालंच नसल्याचं मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहे. 13 वर्षांच्या अथर्वच्या मृत्यूमुळे गोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नगरमध्ये मांज्यामुळे तरुणाची हनुवटी कापली गेली दरम्यान, मकरसंक्रांतीच्या दिवशी अहमगनगर शहरात चायनीज नॉयलॉन मांज्यामुळे अरबाज शेख या अठरा वर्ष युवकाच्या हनुवटी खालील भाग कापला गेला असून त्यावर तब्बल 32 टक्के पडले. चायनीज मांज्याने गंभीर दुखापत झालेल्या अरबाजवर डॉक्टर सागर बोरुडे यांनी तब्बल दोन तास अथक परिश्रमानंतर मांजामुळे कापल्या गेलेला भागावर टाके घालण्यात आले. अरबाज शेख आयुब 15 जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या बोधेगाव-नागापूर रस्त्याने जात असताना पतंगीचा नॉयलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला गेला, अरबाजने तो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हनुवटी खालील भागाला तो अडकून गेल्यामुळे ओढला गेल्याने त्याच्या हनुवटी खालील भागाला मोठी जखम झाली. जखमेतून रक्त वाहू लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला ताबडतोब जवळच असलेल्या डॉक्टर बोरुडे यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉ. बोरुडे यांनीही तातडीने त्याच्यावर उपचार करून टाके टाकले. त्याच्यावर उपचार करताना बोरुडे यांनी मात्र त्यांचे कौशल्य पणाला लावले. अखेर अथक प्रयत्नानंतर कापल्या गेलेल्या भागावर टाके घालण्यात आले. तर येवल्यामध्येही नॉयलॉन मांज्याने एका वृद्ध व्यक्तीचा गळा कापला गेला होता. बाबू अण्णा शिंदे असं या इसमाचे नाव आहे.बाबू शिंदे हे मोटारसायकल वरून घरी जात असतांना मांज्यात अडकून गळा आणि गंभीर दुखापत झाली.यात त्यांना 22 टाके लागले होते.
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या