पुण्यात निर्वस्त्र नायजेरियन तरुणाचा उच्छाद, पुणेकरांनी दिला चोप

पुण्यात निर्वस्त्र नायजेरियन तरुणाचा उच्छाद, पुणेकरांनी दिला चोप

निर्वस्त्र होऊन हा तरुण रस्तावर येणाऱ्या जाणाऱ्यांना मारहाण करत धुमाकूळ घातला होता.

  • Share this:

27 आॅक्टोबर : पुण्यात एका नायजेरियन तरुणाचा हायहोल्टेज ड्राॅमा पुणेकरांनी हाणून पाडला. निर्वस्त्र होऊन हा तरुण रस्तावर येणाऱ्या जाणाऱ्यांना मारहाण करत धुमाकूळ घातला होता.

पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावर आज दुपारी एक नायजेरियन तरुणानं निर्वस्त्र होऊन धुमाकूळ घातला होता. निर्वस्त्र फिरणारा हा तरुण रस्त्यातून येणाऱ्या-जाणाऱ्यांना मारहाण करीत होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या नायजेरियन तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला.  त्यानंतर त्याला एका विजेच्या खांबाला बांधून ठेवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला ताब्यात घेतलं. सध्या त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

First published: October 27, 2017, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading