मुंबई-पुणे एक्स्प्रेस भीषण अपघात, नियंत्रण सुटले अन् ट्रक डोंगरावर आदळला, 2 ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस भीषण अपघात, नियंत्रण सुटले अन् ट्रक डोंगरावर आदळला, 2 ठार

बोरघाटातून नो एंट्री मार्गे जात असताना खिंडीजवळील तीव्र उतारावर चालकाचा ट्रकवरील ताबा अचानक सुटला.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 10 एप्रिल : मुबंई-पुणे जुन्या महामार्गावर (Mumbai-Pune Express) बोरघाटात (BoriGhat) तीव्र उतारावर खिंडीत ट्रकने डोंगराला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पुण्याहून मुबंईकडे माल घेऊन ट्रक जात होता. बोरघाटातून नो एंट्री मार्गे जात असताना खिंडीजवळील तीव्र उतारावर चालकाचा ट्रकवरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे ट्रकने खिंडीच्या डोंगराला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमधील दोन जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, 400 किमी दूर पुरला मृतदेह

ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात तिघे जण अडकले होते. मात्र, एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र, अपघातग्रस्त टीम चे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत अडकेल्याना बाहेर काढण्यात मदत केली.

नको असलेल्या कॉल्स आणि SMS मुळे वैताग आलाय?फोनमध्ये असा अ‍ॅक्टिव्हेट करा DND मोड

अपघातानंतर जखमीला उपचारासाठी तात्काळ ओझर्डे येथील ट्रॉमा सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या   दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. महामार्ग पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम महामार्गावर सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: April 10, 2021, 5:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या