मोठी बातमी, बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, अशी आहे नियमावली!

मोठी बातमी, बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, अशी आहे नियमावली!

लॉकडाऊनची अंमलबजावणी उद्या मध्यरात्री 12 वाजेपासून लागू करण्यात येणार आहे.

  • Share this:

बारामती, 03 मे : राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra corona case) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. बारामतीमध्ये (Baramati Lockdown) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फक्त हॉस्पिटल व मेडिकल दुकानं आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ठराविक वेळच खुली राहणार आहे.

बारामतीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा निर्णय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज जाहीर केला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी उद्या मध्यरात्री 12 वाजेपासून लागू करण्यात येणार आहे.

बाळासहित 100 फूट उंच उडाला पाळणा, अंगावर काटा आणणारी दुर्देवी घटना

गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

फळं घ्यायला कोविड सेंटर सोडून कोरोनाबाधित फिरताय मोकाट, बीडमधला VIDEO

या काळात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहतील. दूध विक्री सकाळी 7 ते 9 यावेळेत सुरू राहील.   भाजी मंडई आणि इतर सर्व आस्थापना बंद राहतील. एमआयडीसीमधील उद्योग व्यवसाय शासकीय नियमानुसार सुरू राहतील.

Published by: sachin Salve
First published: May 3, 2021, 3:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या