'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडेंच्या कारला पुण्यात अपघात

'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडेंच्या कारला पुण्यात अपघात

प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या कारला मंगळवारी (27 ऑगस्ट) रात्री अपघात झाला.

  • Share this:

पुणे, 28 ऑगस्ट : प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या कारला मंगळवारी (27 ऑगस्ट) रात्री अपघात झाला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सासवडजवळील हिवरे गावात त्यांच्या गाडीला अपघात झाला. यावेळेस त्यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे देखील होते. या अपघात सुदैवानं कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी घटनास्थळावर तातडीनं धाव घेतली. 'तरडे  परदेशी आणि चांदणे हे सुखरुप आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', असं आवाहन त्यांच्या चाहत्यांना करण्यात आलं आहे.

(वाचा :काँग्रेसला गवसला हायटेक प्रचाराचा मंत्रा, असं पोहोचणार तरुणांपर्यंत!)

(वाचा : प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, थोडक्यात बचावले)

दरम्यान, मंगळवारी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचाही भीषण अपघात झाला होता. अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले असून यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. पण त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं. मुंबईहून सांगोल्याच्या दिशेनं जात असताना इंदापूरजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. इंदापूरमधील खासगी दवाखान्यात उपचार घेऊन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी (27 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील वरकुटे येथील ही घटना घडली.

(वाचा :राज ठाकरेंच्या आणखी एका कट्टर समर्थकाची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास)

आनंद शिंदे यांच्यासह आणखी तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद शिंदे हे रात्रीच्या सुमारास मुंबईहून सांगोल्याकडे जात होते. यादरम्यान वरकुटे फाट्याजवळ पोहोचल्यानंतर शिंदेंच्या गाडी चालकाला डम्पर दिसला नाही. त्यांच्या चालकाने डंपरला पाठीमागून धडक दिल्यानं अपघात झाला.

VIDEO : रावतेंच्या कार्यक्रमासाठी आरटीओत आलेल्या लोकांची जमवली गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 06:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading