पुण्यातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सची पालिकेला माहितीच नाही!

पुण्यातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सची पालिकेला माहितीच नाही!

पुण्यातील रूफटॉप आणि बेसमेंटमध्ये चालवल्या जाण्याऱ्या बेकायदा हॉटेल्सची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेकडे अशा बेकायदा चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्सची माहितीच नाहीये.

  • Share this:

पुणे, 30 डिसेंबर:  मुंबईतल्या हॉटेलच्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर आम्ही पुण्यातील रूफटॉप आणि बेसमेंटमध्ये चालवल्या जाण्याऱ्या बेकायदा हॉटेल्सची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पुणे महापालिकेकडे अशा बेकायदा चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्सची माहितीच नाहीये.

बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाला याची माहितीच नाही. तर दुसरीकडे शहरात बिनदिक्कत विनापरवाना रूफटॉप हॉटेल्स सुरू आहेत.  अगदी गुगलवर विचारलेल्या रूफटॉप हॉटेलच्या माहिती  शेकडो हॉटेल्सची माहिती उपलब्ध होते आहे. तर ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक हॉटेल्सच्या रूफटॉप पार्टीजच्या जाहिरातीही माध्यमांतून केल्या जात  आहेत. एवढं राजरोसपणे सगळं काही चालू असताना देखील  महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या डोळ्यावरची झापडं काही केल्या उघडत नाही  आहेत.

आता या सगळ्या प्रकारानंतर तरी पुणे महापालिकेला जाग येणार का आणि काही कारवई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

First published: December 30, 2017, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading