पुण्यातील शो रूम मालकाची गोळ्या झाडून हत्या, चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा

पुण्यातील शो रूम मालकाची गोळ्या झाडून हत्या, चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा

आरोपींनी आधी या शो रूम मालकांचं अपहरण केलं. त्यानंतर लोणंद येथील पाडेगाव इथं गोळ्या घालून त्याची हत्या केली आहे.

  • Share this:

किरण मोहिते, सातारा, 6 जानेवारी : लोणंद, पुण्यातील एका शो रूम मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरोपींनी आधी या शो रूम मालकांचं अपहरण केलं. त्यानंतर लोणंद येथील पाडेगाव इथं गोळ्या घालून त्याची हत्या केली आहे. चंदन कृपादास शेवानी (वय 47, रा. बंडगार्डन) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी सातारा येथील लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुणे येथील या व्यापाऱ्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. चंदन शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय असून साधू वासवानी चौकातील परमार पॅराडाईझ येथे कुटुंबीयांसोबत ते राहत होते. काल संध्याकाळपासून त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दिली होती.

सातारा जिल्ह्यातील पाडेगाव जवळच्या कॅनॉलमध्ये (रविवारी) दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावकर्‍यांनी पोलिसांना दिली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता डोक्यात गोळी झाडुन अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन संबधित व्यक्तीची निघृण हत्या केल्याचं स्पष्ट झाले.

पॉर्न पाहाताना तुमचा VIDEO होऊ शकतो रेकॉर्ड?

सातारा पोलिसांनी संबधित मृतदेहाच्या फोटो वरुन पुणे शहर, ग्रामीण, लोणावळा पोलिसांना संपर्क साधला असता पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी यांचा हा मृतदेह असल्याचे माहिती समोर आलीय.

मुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, हे आहेत महत्त्वाचे अड्डे

या घटनेत सातारा पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली असून, त्यात 2 Cr. नही दिये इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा असं लिहीलेलं आहे. त्यामुळे दोन कोटींच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरणकरून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2020 09:13 AM IST

ताज्या बातम्या