कबड्डी की मॅरेथॉन? पुण्यात छाजेड विरुद्ध बापट कुस्ती रंगणार!

कबड्डी की मॅरेथॉन? पुण्यात छाजेड विरुद्ध बापट कुस्ती रंगणार!

कबड्डी की मॅरेथॉन? अशा नव्या वादामुळे पुण्यात अभय छाजेड विरुद्ध गिरीष बापट अशी कुस्ती पहायला मिळणार आहे.

  • Share this:

पुणे, 25 नोव्हेंबर : पुण्यात एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलंय. देशातली पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन अर्थात 'पुणे मॅरेथॉन'चा यंदाचा यंदा समारोप होणार आहे. मात्र, ज्या मैदानावर या मॅरेथॉनचा समारोप होणार आहे, त्याच मैदानावर नामदार कबड्डी स्पर्धेची जोमानं पूर्वतयारी सुरू आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठी संयोजक म्हणून काँग्रेसचे अभय छाजेड यांनी, तर कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी गिरीष बापटांनी पुढाकार घेतलाय. तेव्हा कबड्डी की मॅरेथॉन? अशा नव्या वादामुळे पुण्यात छाजेड विरुद्ध बापट अशी कुस्ती पहायला मिळणार आहे.

पुण्यात कबड्डी की मॅरेथॉन असा आगळाच वाद आता पेटताना दिसतोय. पुण्याती ज्या सणस मैदानावर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप होणार आहे, त्याच मैदानावर त्याच दिवशी गिरीष बापटांनी आयोजित केलेल्या नामदार चषक कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन आहे. दोन्ही कार्यक्रमांचे आयोजक माघार घेण्यास तयार नसल्यामुळे पुण्यात कबड्डी की मॅरेथॉन? अशा नव्या वादाला तोंड फुटलंय. एका अर्थान कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी राजकीय कुरघोडी पहावयास मिळत असल्याने यात छाजेड विरुद्ध बापट अशी कुस्ती रंगणार असल्याचं दिसतंय.

कबड्डी स्पर्धेसाठी राज्यभरातील खेळाडू तर मॅरेथॉनसाठी देशभरातून स्पर्धक पुण्यात दाखल होणार असून, दोन्ही कार्यक्रमाला मोठी गर्दी पहावयास मिळणार आहे. त्यामुळे सणस मैदानावर सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेल्या मॅरेथॉनचे संयोजक काँग्रेसचे अभय छाजेड आणि नामदार चषक कबड्डी स्पर्धेसाठी पुढाकार घेतलेले भाजपचे गिरीश बापट यांच्यात सणस मैदान कशासाठी या कारणावरून चांगलाच वाद सुरू झाला आहे.

 ...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

First published: November 25, 2018, 11:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading