पुणे, 04 डिसेंबर : पुण्यात खून, मारामाऱ्या या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रमाणातही वाढ होत आहे. तसेच प्रेमप्रकरणाच्या घटना वाढत आहेत यातून एकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथे घटना घडली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 1 डिसेंबरच्या रात्री त्या मुलाचे अपहरण केले होते. त्याला रात्रभर मारून सोडून देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणाच्या संशयातून चौघांनी एका तरुणाचे अपहरण केले होते. त्याला रात्रभर खोलीत डांबून जबरदस्तीने दारू पाजत लाथाबुक्क्यांसह बांबू, स्टिलच्या पाईपाने डोक्यात, हातावर मारून काचेची बाटली डोक्यात फोडली. यामध्ये त्या तरूणाला जबर मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या कानातून रक्तस्त्राव झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तन्मय दीपक पाचरणे (वय 20, रा. पाचरणे आळी, वाघोली), वेदांत महादेव गपाट (वय 19, रा. शंकरनगर, खराडी) या दोघांना अटक केली आहे.
हे ही वाचा : सोलापुरातील त्या लग्नाला वेगळंच वळण; जुळ्या बहिणींशी विवाह करणं तरुणाला भोवणार? पोलिसांत पोहोचलं प्रकरण
याबाबत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्रांतवाडी येथील एका 19 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. ही घटना 1 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते 2 डिसेंबर रोजी सकाळी सहापर्यंतच्या कालावधीत जुना मुंढवा रोड परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण कॉम्प्युटर इंजिनीयर आहे. सध्या काही काम नसल्यामुळे तो एका हॉटेलमध्ये पार्टटाईम काम करतो.
2019 ते 2022 या कालावधीत वाघोली येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आरोपी तन्मय, फिर्यादी तरुण आणि त्याची मैत्रिण हे एकत्र होते. 1 डिसेंबर रोजी फिर्यादी तरुण त्याच्या मित्रांना भेटून दुचाकीवरून हॉटेलकडे निघाला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास तन्मयने त्याच्या मोबाईलवर फोन करून गाडी बंद पडल्याचे सांगून त्याला बॉलिवूड थिएटर जुना मुंढवा रोड येथे बोलावून घेतले. तेथे थांबलेल्या तन्मयचा मित्र वेदांत आणि अन्य साथीदारांच्या मदतीने फिर्यादी तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण केले.
हे ही वाचा : Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू
दरम्यान त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेउन तू तिच्यासोबत का बोलतोस. ती मला आवडते. ती माझीच आहे, असे म्हणून शिवागाळ करत जुना मुंढवा रोड येथील एका खोलीत नेऊन फिर्यादीला तरुणाला बांबू, स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण केली आणि दुसर्या दिवशी खराडी परिसरात सोडत पोलिस तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी तरुणाने भावाला फोन करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Pune, Pune (City/Town/Village), Pune police