पुणे लोकसभा निवडणूक : गिरीश बापट VS मोहन जोशी, भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत

पुणे लोकसभा निवडणूक : गिरीश बापट VS मोहन जोशी, भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत

या लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी गिरीश बापट यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने मोहन जोशींना रिंगणात उतरवलं. या निवडणुकीत मुख्य लढत या दोन उमेदवारांमध्येच आहे.

  • Share this:

पुणे, 11 मे : या लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी गिरीश बापट यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने मोहन जोशींना रिंगणात उतरवलं. या निवडणुकीत मुख्य लढत या दोन उमेदवारांमध्येच आहे.

2014 ची लोकसभा निवडणूक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा विजय झाला होता. शिरोळेंना 5 लाख 69 हजार 825 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे 2 लाख 54 हजार 56 एवढीच मतं मिळवू शकले. या निवडणुकीत मनसेचे दीपक पायगुडे तिसऱ्या स्थानावर होते.

राजकीय इतिहास

पुणे लोकसभा मतदारसंघ याआधी अनेक वर्षं काँग्रेस किंवा भाजप या दोन पक्षांकडेच राहिला आहे. 1991 मध्ये भाजपचे अण्णा जोशी खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ही जागा कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपकडे होती.

2014 मध्ये काँग्रेसचा पराभव

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेमुळे काँग्रेसचा सपशेल पराभव झाला होता.

या लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं. इथे यावेळी फक्त 48 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे हाही मुद्दा चर्चेत राहिला. मागच्या लोकसभा निवडणुकीत इथे 54.14 टक्के मतदान झालं होतं.

याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांना 2 लाख 79 हजार 973 एवढी मतं मिळाली. भाजपचे अनिल शिरोळे यांना 2 लाख 54 हजार 272 मतं मिळाली होती.

पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पार्वती, पुणे कँटॉनमेंट आणि कसबा पेठ हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सगळ्या मतदारसंघांवर सध्या भाजपचं वर्चस्व आहे.

==============================================================================

VIDEO: दुफळी माजवणारा क्रमांक एकचा नेता, लेखातून मोदींवर 'टाईम बॉम्ब'

First published: May 11, 2019, 6:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading