पाळणाघर संचालिकेचा मुलगाच करायचा चिमुकलीवर अत्याचार!

पाळणाघर संचालिकेचा मुलगाच करायचा चिमुकलीवर अत्याचार!

कोथरूडमधील एका पाळणाघरातल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरूणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

  • Share this:

पुणे, 1 सप्टेबर : कोथरूडमधील एका पाळणाघरातल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरूणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चिमुकलीच्या आईने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन तरूण आणि पाळणाघराच्या संचालिकेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आई ही नोकरी करत असल्यामुळे ती तीच्या तीन वर्षांच्या मुलीला कोथरूडमध्ये असलेल्या एका पाळणाघरात ठेवायची. पाळणाघराच्या संचालिकेला एक 17 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्याकडे एका 18 वर्षाचा मित्राचे येणे-जाणे होते. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांनी या तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले.

संशय आल्यामुळे चिमुकलीच्या पालकांनी तीच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तीने पाळणाघरातला दादाने असे करायचे असल्याचे सांगितले. हा धक्कादायक प्रकार समोर येताच मुलीच्या पालकांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी पाळणाघर संचालिकेच्या अल्पवयीन मुलगा व त्याचा मित्र दोघांना ताब्यात घेतले आणि दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 'सनातनवर बंदी घातलीच पाहिजे'

First published: September 1, 2018, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading