पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, मात्र जरा जपूनच वापरा

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, मात्र जरा जपूनच वापरा

'उन्हाळ्यात खडकवासला धरणातला पाणीसाठा निच्चांकी पातळीवर आला होता. पाण्याचा साठा वाढला असला तरी वापर काळजीपूर्वक करा.'

  • Share this:

पुणे, 7 जुलै : गेली काही महिने पुणेकरांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. गेली काही होत असलेल्या दमदार पावसाने पुणेकरांची चिंता मिटली आहे. पुण्याला पाणीपुरवढा करणाऱ्या खडकवासला धरणात पाण्याची पातळी वाढत असून तीन महिने पुरेल एवढं पाणी धरणात जमा झालंय. असं असलं तरी पाणी जपूनच वापरलं पाहिजे असं आवाहन प्रशासनाने केलंय. उन्हाळ्यात खडकवासला धरणातला पाणीसाठा निच्चांकी पातळीवर आला होता.

दमदार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होतेय. धरणक्षेञात जोरदार पाऊस पडू लागल्याने गेल्या आठवड्याभरातच पाणीसाठा तब्बल 4 टीएमसीने वाढलाय. गेल्या 24 तासामध्ये तर तब्बल सव्वा टिएमसी जलसाठा वाढून एकूण जलसाठा सव्वा सहा टीएमसीवर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटलीय. पुणेकरांना किमान तीन महिने पुरेल एवढा जलसाठा खडकवासला धरणात जमा झालाय.

Bigg Boss Marathi 2- अन् माधवच्या चाहत्याने या स्पर्धकाविरुद्ध केली चुगली

साखर उद्योग संकटात

देशात साखरेचं झालेलं जास्त उत्पादन हीच खरी समस्या असून कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीकडे वळलं तरच ते तरू शकतील अन्यथा नाही. आता सरकारलाही फार काही मदत करणं शक्य नाही असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयजोतित साखर परिषदेत ते बोलत होते. पुण्यात आज साखर परिषदेचा समारोप झाला. या दोन दिवसीय साखर परिषदेत साखर उद्योगासमोरील संकटं आणि त्यावरील उपायांवर सविस्तर चर्चा झाली. शेवटच्या सत्रात अनेक ठरावही पारित केले गेले. राज्य शिखर बँकेच्यावतीने ही साखर परिषद भरवण्यात आली होती.

काय म्हणाले गडकरी?

मी साखर उद्योगात आलो असलो, तरी इतरांनी त्यात पडू नये. कारण साखरेचं भरघोस उत्पादन हीच मोठी समस्या. सध्या मालाला उठाव नाही. या देशात पाण्याची नाही तर नियोजनाची कमकरता आहे. आता कारखानदारांनी साखरेएवजी इथेनॉलचं उत्पादन वाढवावं.

वादळाच्या तडाख्याने पवनचक्कीचे पाते हवेत उडाले, सांगलीतला सांगून VIDEO व्हायरल

शरद पवारांचा सल्ला

या परिषदेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवारही उपस्थित होते. ते म्हणाले,साखर परिषद भरवल्याबद्दल शिखर बँकेचं अभिनंदन. शिखर बँकेमुळेच साखर उद्योग वाढला, पतपुरवठा मिळाल्यामुळेच कारखाने निघाले.साखर धंदा राज्यात महत्वाचा, देशातले साडेपाच कोटी शेतकरी या धंद्यात आहेत.

पुढचं वर्ष साखर धंदयासाठी अडचणीचं ठरू शकतं,  साखरेला सध्या बाजारात उठाव नाही. केंद्र सरकारने अडचणीतील साखर उद्योगाला मदत करावी. साखर कारखानदारांनी व्यावसायिकता अंगिकारावी. खर्च आणि उत्पादन याचा मेळ घातला गेला पाहिजे. काही कारखाने नफ्यात तर तोट्यात हे गणित कळत नाही.

First published: July 7, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या