पुण्यातील कयानी बेकरीला टाळ लागणार?

पुण्यातील कयानी बेकरीला टाळ लागणार?

कयानी बेकरी ज्या जागेत चालवली जाते ती जागा लष्कराच्या अधिपत्याखाली असलेल्या पुणे कॅन्टोमेंटची आहे आणि या जागेत व्यवसाय करण्यासाठी पुणे कॅन्टोमेंट आणि लष्कराच्या व्यवसाय परवानगीची आवश्यकता असते

  • Share this:

11 आॅक्टोबर : जगप्रसिद्ध असलेल्या पुणे कॅम्पमधील कयानी बेकरीला आता टाळं लागण्याची शक्यता निर्माण झालीये. तसे तोंडी आदेशच पुणे कॅन्टेमेंटच्या अधिकाऱ्यांनी कयानी बेकरीच्या मालकांना दिले आहेत.

कयानी बेकरी ज्या जागेत चालवली जाते ती जागा लष्कराच्या अधिपत्याखाली असलेल्या पुणे कॅन्टोमेंटची आहे आणि या जागेत व्यवसाय करण्यासाठी पुणे कॅन्टोमेंट आणि लष्कराच्या व्यवसाय परवानगीची आवश्यकता असते. मात्र, कयानी बेकरीची ही परवानगी २००६ सालीच संपली असून त्यानंतर नुतनीकरणाचे कुठलेही प्रयत्न कयानी बेकरीच्या मालकांकडून करण्यात आलेले नाहीत.

कयानी बेकरी सोबतच क्वालिटी रेस्टॉरंट आणि बागबान या प्रसिद्ध मांसाहारी रेस्टॉरंट च्या मालकांना ही हॉटेल बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार ही दोन्ही हॉटेल्स आज बंद ठेवण्यात आली होती. तर कयानी बेकरी मात्र नियमित वेळी सुरू होऊन दुपारी १ वाजता बंद करण्यात आली होती. श्रुजबेरी बिस्कीट आणि प्लम वाईन केकसाठी कयानी बेकरी ही जगप्रसिद्ध आहे. अनेक परदेशी नागरिक हे खास इथली बिस्कीटस खरेदी करण्यासाठी पुण्यात येतात.

First published: October 11, 2017, 9:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading