पुणे: पाकिस्तानी मालिका पाहणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

पुणे: पाकिस्तानी मालिका पाहणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

पत्नीने पाकिस्तानी मालिका पाहिली म्हणून पतीनेच कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सलीसबारी पार्क येथे घडली.

  • Share this:

पुणे, 12 मार्च: पत्नीने पाकिस्तानी मालिका पाहिली म्हणून पतीनेच कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सलीसबारी पार्क येथे घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलिसांनी संबंधित नवऱ्याला अटक केली आहे.

पुण्यातील सलीसबारी पार्क येथे आसिफ नायाब आणि नर्गिस हे पती-पत्नी केल्या काही वर्षापासून राहतात. काही दिवासांपूर्वी काही किरकोळ कारणावरून दोघांच्यात भांडण झाले होते. तेव्हापासून ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. नर्गीस मोबाईलवर पाकिस्तान मालिका बघत असल्याचे आसिफला दिसले. पाकिस्तानी मालिका बघण्यापेक्षा माझ्याशी बोल असे म्हणत त्याने नर्गिसवर कोयत्याने वार केले. कोयता लागू नये म्हणून नर्गिसने हात मध्ये केला. त्याचवेळी नर्गीसच्या हाताचा अंगठा तुटून बाजूला पडला. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

कोयत्याच्या हल्ल्यात मोठा रक्तस्त्रावही झाला होता. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी आसिफला अटक केली.

SPECIAL REPORT : 'सेनेच्या दबावामुळे कोल्हेंना मालिका बंद करावी लागली'

Tags: pune
First Published: Mar 12, 2019 10:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading