पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला

पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला

कचरा डेपोनंतर आता कचरा प्रक्रिया प्रकल्प फुरसुंगीला महापालिकेला सुरू करायचा होता. पण गावकऱ्यांनी या प्रकल्पाला प्रचंड विरोध केला होता. तब्बल 750 टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता.

  • Share this:

पुणे, 07 सप्टेंबर: पुण्यातील कचरा प्रश्न  पुन्हा पेटला आहे.   आता तो अधिकच जटील होत चालला आहे.  उरुळी देवाची, फुरसुंगी गावातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर, पर्यायी कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत समस्या अधिक वाढल्या आहेत.

कचरा डेपोनंतर आता कचरा प्रक्रिया प्रकल्प फुरसुंगीला महापालिकेला सुरू करायचा होता. पण गावकऱ्यांनी या प्रकल्पाला प्रचंड विरोध केला होता. तब्बल 750 टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. आता हडपसर-रामटेकडी इथं प्रकल्प उभारावा असं महापालिकेचं म्हणणं आहे. तर हडपसरच्या प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरोध करत आहेत. यामुळे प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबतची कामं मंद गतीनं सुरू आहेत.

आता या प्रकल्पाबद्दलच्या याचिकेवर हरित लवादात निर्णय येणं अपेक्षित आहे. त्यानंतर तरी हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading