आळशी पुणेकर, या कचरा वेचकाचे अश्रू पुसतील का ?

आळशी पुणेकर, या कचरा वेचकाचे अश्रू पुसतील का ?

"आम्ही दुनियाची घाण उचलतो...तरी आमच्याकडे कुणी लक्ष्य देत नाही...सुका ओला कचरा करायचं सांगितलं तरी ही लोकं करत नाही...गाडीवाले मग कचरा घेत नाही...मी काय करू...."

  • Share this:

03 मे : "आम्ही दुनियाची घाण उचलतो...तरी आमच्याकडे कुणी लक्ष्य देत नाही...सुका ओला कचरा करायचं सांगितलं तरी ही लोकं करत नाही...गाडीवाले मग कचरा घेत नाही...मी काय करू...." ही व्यथा आहे पुण्यातील कचरा वेचकाची...हे सांगताना कचरा वेचकाला अश्रू अनावर झाले आणि तो ढसाढसा रडला.

'पुणे तिथे काय उणे' असं मिरवणारे चोखंदळ पुणेकर किती आळशी आहे याचा पुरावा कचरावेचकाने जगजाहीर केला. हल्ली या ना त्या कारणावरुन लोकांना शहाणपणा शिकवणारे पुणेकर स्वत:किती आळशी आहे याचा पाढाच या कचरावेचकाने आयबीएन लोकमतकडे मांडला.

तसं पुणेकर प्रत्येक बाबतीत सजग मानले जातात. पण कचऱ्याच्या बाबतीत पुणेकर थोडेसे निष्काळजी दिसतात. महापालिका ओला आणि सुका कचरा वेगळा करा असं सांगत असताना पुणेकर मात्र त्याकडं दुर्लक्ष करतात. याचा त्रास सोसायटीचा कचरा वेचणाऱ्यांना होतो. महापालिकेचे कर्मचारी या कचरा वेचणाऱ्यांकडून कचरा वेगळा करुन घेतात. त्यामुळे कचरा वेचणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. रोजच्या कचऱ्याच्या समस्येमुळे कचरावेचक रडकुंडीला आलाय.

आपटे रोडवरील एका कचरावेचकाने रोजच्या दगादगीचा पाढाच वाचून दाखवला. आम्ही दुनियाची घाण उचलतो...तरी आमच्याकडे कुणी लक्ष्य देत नाही...सुका ओला कचरा करायचं सांगितलं तरी ही लोकं करत नाही...मग गाडीवाले कचरा मग घेत नाही...मी काय करू...अशी रडत रडत व्यथा या कचरावेचकाने आयबीएन लोकमतकडे मांडली.

आम्ही बायका-लेकरं कचरा वेचण्याचं काम करतो...लोकांना महिन्याभरापासून सांगतोय...ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा...पण ही लोकं काही ऐकत नाही असं सांगताना कचरा वेचक ढसाढसा रडला. एकीकडे फुरसुंगी आणि उरुलीदेवाचे ग्रामस्थ कचरा डेपोसाठी रस्त्यावर उतरले आहे. पण दुसरीकडे पुणेकरच किती आळशी आणि निष्काळजी आहे याचा हा पुरावा...निदान आता तरी पुणेकर सुधारतील का ? हाच मोठा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 06:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading