SPECIAL REPORT :..आणि 10 महिन्याच्या चिमुरड्याने पुण्यात पुराची मगरमिठ्ठी भेदली

SPECIAL REPORT :..आणि 10 महिन्याच्या चिमुरड्याने पुण्यात पुराची मगरमिठ्ठी भेदली

पाण्याची महाभयंकर मगरमिठी भेदून एक निरागस आणि चिमुकला जीव आई-वडिलांच्या कुशीत पुन्हा विसावला.

  • Share this:

अद्वैत मेहता,प्रतिनिधी

पुणे, 26 सप्टेंबर : पुण्याच्या पुरात एकीकडे 17 जणांना जलसमाधी मिळाली. तर त्याचवेळी निष्पाप आणि चिमुरडा जीव पाण्याच्या मगरमिठीतून सहीसलामत बचावला.

पाण्याची महाभयंकर मगरमिठी भेदून एक निरागस आणि चिमुकला जीव आई-वडिलांच्या कुशीत पुन्हा विसावला.

ढगफुटीसारखा पाऊस आणि अतिक्रमणांच्या विळख्यानं पुण्यात जलप्रलय अवतरला.

पर्वती भागातील मित्रमंडळ चौकात पाण्याच्या महाभयंकर लोंढ्यात 10 महिन्यांचा राजस नातू हा चिमुरडा जीव सापडला.

मात्र, अग्निशमन दलाचे मारुती देवकुळे हे जवान देवदूताच्या रुपात धावून आले.देवकुळे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पद्मावती भागातील ट्रेजर पार्क परिसरात बचावकार्याला जात होते.

मात्र, एका बंगल्यात 5 जण अडकल्याची वार्ता त्यांची कानी पोहोचली आणि पुराच्या मगरमिठीतून निष्पाप जीवाची सुखरुप सुटका करण्यात आली.

देव कोणत्या रुपात धावून येईल हे सांगता येत नाही, असं आपण अनेकदा ऐकलंय.मात्र, नातू कुटुंबानं त्याचा जिवंत अनुभवही घेतला.

दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं महिलेचं सगळं काही हिरावून घेतलं आहे. दांडेकर पूल परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात इथली वस्ती होत्याची नव्हती झाली. कष्टकऱ्यांच्या या वसाहतीत पुराच्या पाण्यानं अक्षरश: थैमान घातलं होतं. पै-पै जमा करुन जमा केलेला संसार मातीमोल झाला.

मित्रमंडळ चौक परिसरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेनं हालचाल करुन त्या आईसह त्या बाळाची पाण्यातून सुटका केली.

पुण्यातील कात्रज, धनकवडी परिसरात पावसामुळं भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. काही भागात इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पुराचं पाणी साचलं होतं.

कात्रज तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे या परिसरातील अनेक सोसायट्यांना पाण्यानं वेढा घातला होता. इमारतीच्या संरक्षक भिंती तोडून पुराचं पाणी इमारतीत शिरलं. त्यामुळं इमारत परिसरतील उभी असलेली वाहनं वाहून गेली.

मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याचा फटका या परिसरातील गोशाळांनाही बसला आहे. पुराच्या पाण्यात ३०हून अधिक जनावरे वाहून गेली. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं गुरुवारी पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या पूर परिस्थितीमुळं पुणेकर पुरते हादरून गेले आहे.

==============

Published by: sachin Salve
First published: September 26, 2019, 7:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading