एल्गार परिषदेवरून नवं राजकारण, मुख्यमंत्र्याच्या भूमिकेवर शिवसेनेचे 'मित्र पक्ष' नाराज

एल्गार परिषदेवरून नवं राजकारण, मुख्यमंत्र्याच्या भूमिकेवर शिवसेनेचे 'मित्र पक्ष' नाराज

महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार परिषदेचा तपास एनआयए माध्यमातून करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयास नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई,18 फेब्रुवारी: एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास संस्ठेच्या (एनएआय) माध्यमातून करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये आता नवं राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार परिषदेचा तपास एनआयए माध्यमातून करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयास नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एल्गार परिषदेचा तपास एनआयए देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएच्या माध्यमातून करण्यास परवानगी दिल्यानंतर महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. एल्गार परिषदेचा तपास करताना त्यांचा अपराध नाही त्यांच्यावर ही गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण अनेकांना या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत राज्यातील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) समांतर तपास करावा यासाठी आग्रही आहे. तत्कालीन गृहमंत्री यांनी पोलिसांवर दबाव वाढवत यात काही जणांना गुंतवले आहे का, हे भविष्यात स्पष्ट होईल. अशा स्वरूपात भूमिका अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रसिद्धीसाठी तपास एनआयए करणे म्हणजे राज्यातील पुरोगामी अनेकांवर विनाकारण अन्याय होणार नाही ना, असा सूर लावला आहे.

'एल्गारचा तपास NIA कडे देणं संशयास्पद....' थोरात यांचं धक्कादायक विधान

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देखील मुख्यमंत्री मात्र स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहेत. एल्गार परिषदेचा तपास आणि भीमा कोरेगाव प्रकरण हे दोन वेगळे आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण हे दलित समाजाशी निगडित असून दलितांवर कोणताही अन्याय सरकार करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतःच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

'हेमंत करकरे यांची हत्या कसाबच्या गोळ्यांनी नव्हे, महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तूलने झाली'

एल्गार परिस्थितीचा मुद्दा करत शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गृहमंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा चित्र तयार केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे टार्गेट एल्गार, असो किंवा भीमा कोरेगाव प्रकरण असो यातून भाजपवर टीका हेच ध्येय दिसत आहे. पण या सगळ्या प्रकरणांमध्ये शिवसेना एल्गार प्रकरणांमध्ये सॉफ्ट का झाली, याचीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. शिवसेना पक्षावर एल्गार परिषदेचा मुद्दा करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दबाव वाढवून भविष्यात वेगळं काही पदरी पाडून घ्यायच्या मनस्थितीत असल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातही एल्गार परिषदेच्या संबंधित विचारसरणींच्या संस्था लोक आपल्याशी जोडली जावी, असाही विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

First published: February 18, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading