मालकासोबत हा कुत्राही करतो प्राणायम, पुण्यातील भन्नाट VIDEO VIRAL

मालकासोबत हा कुत्राही करतो प्राणायम, पुण्यातील भन्नाट VIDEO VIRAL

जॉगिंग करून आल्यानंतर ते दोघेही तब्बल एक तास प्राणायमासाठी एकत्र असतात.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 20 जानेवारी : आपल्या मालकासोबत प्राणायम करणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या मालकाने प्राणायमातील ओंकार उच्चार करताच हा कुत्राही तसंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हायरल व्हिडिओतून दिसत आहे. अर्थात तो प्राणायम करतो का हे माहीत नाही, पण त्याच्या या कृतीवर सोशल मीडियावर युझर्सनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

विशेष म्हणजे या कुत्र्याचे मालक पुणे पोलीस दलातील पोलीस निरीक्षक महादेव कुंभार हे आहेत. ते दररोज दररोज भल्या पहाटे जॉगिंगसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्या मागोमाग त्यांचा हा कुत्रा ज्याचं नाव राजा आहे, तोदेखील न चुकता बाहेर पडतो. जॉगिंग करून आल्यानंतर ते दोघेही तब्बल एक तास प्राणायमासाठी एकत्र असतात.

यावेळी कुंभार हे ओम जप करताना त्यांचा कुत्रा राजाही छान सूर लावत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

दरम्यान, आजकालच्या धावपळीच्या जगात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे योगा, व्यायाम या गोष्टींसाठी वेळ नसल्याची ओरड सुरू होते. मात्र पुण्यातील व्हायरल व्हिडिओची सर्वत्र मात्र चांगलीच चर्चा होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 20, 2021, 8:48 PM IST

ताज्या बातम्या