लाडक्या कुत्र्याला न्याय मिळावा म्हणून पठ्ठयानं केलं जीवाचं रान!

लाडक्या कुत्र्याला न्याय मिळावा म्हणून पठ्ठयानं केलं जीवाचं रान!

कौन्सिल च्या आदेशानंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणात डॉक्टर आणि नर्स यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

  • Share this:

वैभव सोनवणे,पुणे, 6 डिसेंबर : कुत्रा म्हणजे श्वानप्रेमींसाठी जीव की प्राण. या लाडक्या दोस्तासाठी काय वाट्टेल ते करण्याची श्वानप्रेमींची तयारी असते. पुण्यातल्या अशाच एका श्वानप्रेमीनं मृत्यू पावलेल्या कुत्र्याला न्याय मिळावा म्हणून कायदेशीर लढाई लढली आणि तो जिंकला

हडपसर इथल्या योगेश गवळी यांनी मुलीला कुत्रा आवडतो म्हणून  गोल्डन रित्रीव्हर जातीचं पिल्लू घरी आणलं होतं काही दिवसांनी हे पिल्लू आजारी पडल्यावर त्याला माई पेट क्लिनिक मध्ये त्यांनी उपचारासाठी नेलं होतं. मात्र आठ दिवसांच्या उपचारानंतर त्या पिल्लाचा मृत्यू झाला. उमेश यांनी उपचाराविषयी नापसंती व्यक्त केली.

उपचारासाठी डॉक्टर ऐवजी इतर कर्मचाऱ्यांनीच इंजेक्शन्स दिली आणि त्यातच या पिल्लाचा मृत्यू झाला. डॉक्टराना वारंवार फोन करूनही ते समोर आले नाहीत असं गवळी यांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी उपचाराचे पैसे पूर्ण घेतले असंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे गवळी यांनी व्हेटर्नरी कॉन्सिलकडे तक्रार केली. पिल्लाच्या पोस्टमार्टेमचे रिपोर्टर्स आणि इतर सगळी कागदपत्र गोळा करून त्यांनी कॉन्सिलकडे सादर केली. शेवटी क्लिनिकचे  डॉक्टर दिलीप सोनुने,अपूर्वा गुजराती,क्लिनिकच्या मालक इशिता लाल आणि दोन नर्स यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश कॉन्सिलने दिले आहेत. कौन्सिल च्या आदेशानंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणात डॉक्टर आणि नर्स यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

 

VIDEO: ..आणि ते जीव धोक्यात घालून अजगरासोबत खेळत राहीले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 06:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading