पुण्याचा 'डोटू' अखेर घरी परतला! Zomato च्या डिलिव्हरी बॉयने पळवल्याचा होता आरोप

डोटू बेपत्ता झाल्यानंतर शोध घेताना त्याचं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच #uninstallzomato अशी मोहिमही सुरू करण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 03:11 PM IST

पुण्याचा 'डोटू' अखेर घरी परतला! Zomato च्या डिलिव्हरी बॉयने पळवल्याचा होता आरोप

पुणे, 11 ऑक्टोबर : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पाळीव कुत्रा पळवून नेल्याचा आरोप एका कुटुंबाने दोन दिवसांपूर्वी केला होता. डोटू नावाच्या या कुत्र्याला डिलिव्हरी बॉयने पळवल्याची तक्रार त्याच्या मालकीणनं केली होती. आता त्याचा शोध लागला असून डोटू संबंधित कुटुंबात परतला आहे. कर्वे रोड इथं राहणाऱ्या वंदना शहा यांना झोमॅटोवर आरोप करत #uninstallzomato मोहिमसुद्धा सुरू केली होती. यामध्ये डोटूचं अपहरण कसं झालं तेही सांगितलं होतं. दरम्यान, झोमॅटोनं स्पष्ट केलं की ज्याने अपहरण केलं तो झोमॅटोचा कर्मचारी नाही.

वंदना शहा यांनी दोन महिन्याच्या लहान डोटू बेपत्ता झाल्यानंतर जवळच्या रेस्टॉरंटमध्ये फूड डिलिव्हरी करणाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी एका डिलिव्हरी बॉयने सांगितलं की, असाच एक कुत्रा त्यांच्या सहकाऱ्याकडे आहे. त्यावेळी सहकाऱ्याच्या घरचा पत्ताही मिळाला होता. त्यानंतर त्याचे डॉट्टूसोबतचे फोटोही समोर आले. तेव्हा वंदना यांनी डोटू परत द्यावा अशी मागणी संबंधिताकडे केली. मात्र त्याने याला नकार दिला. अखेर वंदना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्याचे नाव तुषार असल्याचे सांगितले होते. याबद्दल वंदना यांनी सांगितलं की, मी तुषारसोबत बोलले त्यावेळी डॉट्टूला पळवून नेल्याचं त्यानं मान्य केलं. मात्र जेव्हा डोटूला परत देण्याबद्दल सांगितलं तेव्हा वेगवेगळी कारणं द्यायला सुरुवात केली. डोटूला परत देण्यासाठी पैसे देण्यासही तयार होते पण आमची दिशाभूल करणारी उत्तरे तुषार देत होता. त्यानंतर त्यानं फोन बंद केला. अखेर त्यानं आम्हाला त्याच्या मुळशीतील घराचा पत्ता दिला. तिथून आम्ही डोटूला परत घेऊन आलो.

झोमॅटोने डोटूच्या अपहरणात त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा हात नसल्याचं सांगितलं आहे. झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, डोटू बेपत्ता झाल्यानं लागलेली काळजी आम्ही समजू शकतो. आम्ही आमचा डाटाबेस, डिलिव्हरी पार्टनर नेटवर्क याशिवाय पोलिसांसोबत याची चौकशी केली. त्यानंतरच आम्ही स्पष्ट करत आहे की, डोटूचं अपहरण करणारा कर्मचारी आमचा नाही.

कुत्रा अचानक झाला बेपत्ता

Loading...

पुण्यातील कर्वे रोड येथून 7 ऑक्टोबर रोजी शहा दाम्पत्याचा पाळीव कुत्रा अचानक बेपत्ता झाला. आपला कुत्रा कुठेच दिसून येत नसल्याचं लक्षात येत शहा दाम्पत्यानं त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्यांना अपयश हाती आले. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं असता डॉट्टू त्यांना परिसरातच खेळताना आढळला. त्यानंतर काही वेळानं तो गायब झाला.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dog
First Published: Oct 11, 2019 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...