Home /News /maharashtra /

पुणे : एकाच वेळी तब्बल 25 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली

पुणे : एकाच वेळी तब्बल 25 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली

शिक्षकांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पुणे, 25 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सध्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. त्यामुळे दिनांक 23 आणि 24 डिसेंबरला सासासवड येथे सुमारे सव्वाशे शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 25 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे. हे सर्व शिक्षक ग्रामपंचायत इलेक्शन ड्युटीसाठी नियुक्त केले जाणार होते. म्हणून या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरीकडे, जेजुरी येथेही 159 शिक्षकांची आर टी पी सी आर कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. यामुळे तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे असून पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विद्यार्थी व त्यांचे पालक यांचीही कोरोना चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून सर्व काळजी घेत सॅनिटायझर ,मास्कचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. काही ठिकाणी स्वयंप्रेरणेने शिक्षण देत आहेत. ज्याठिकाणी ऑनलाईन सुविधा नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये दररोज 50 टक्के शिक्षक उपस्थित राहून शालेय कामकाजा बरोबर विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा संपर्क विद्यार्थी व पालकांशी देखील येतो असे गृहीत धरून पुरंदरच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानुसार 125 शिक्षकांनी केलेल्या चाचणीमध्ये दिनांक 23 रोजी सहा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व दोन नगरपरिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर दिनांक 24 रोजी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये 17 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 25 प्राथमिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामधील काही शिक्षकांना कसलीही लक्षणे नसताना देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. ज्या गावातील प्राथमिक शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या गावातील विद्यार्थ्यांचे व पालकांचे संपर्क आलेल्या सर्वांशी कोरोना टेस्ट होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची आहे. तर याबाबत बोलताना गटशिक्षण अधिकारी मोहन गायकवाड म्हणाले की, यापूर्वी दोन शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वच शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याबाबत आवाहन केले होते. त्यामुळे आता 25 शिक्षक कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. या शिक्षकांची पुन्हा आर टी पी सी आर चाचणी करण्यात येणार आहे. तर बाधित शिक्षकाच्या संपर्कात असलेले विद्यार्थी व पालक यांचीही तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या