Home /News /maharashtra /

इन्स्टाग्रामवर धोका! पुणेकरांना सायबर चोरांनी घातला गंडा

इन्स्टाग्रामवर धोका! पुणेकरांना सायबर चोरांनी घातला गंडा

फोटो शेअरिंगसाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवर प्रत्येक मिनिटाला 55 हजार 140 फोटो शेअर केले जातात.

फोटो शेअरिंगसाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवर प्रत्येक मिनिटाला 55 हजार 140 फोटो शेअर केले जातात.

पुण्यातील महिलेला इन्स्टाग्रामवर केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे

    पुणे, 16 जानेवारी : पुण्यातील एका महिलेला समाजमाध्यमांवर केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. या सायबर गुन्हेगाराने या महिलेला फसवून तिला एक किंवा दोन नाही तर तब्बल 11 लाखांना गंडा घातला आहे. ही महिला पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात परिचारिकेचं काम करते. पाच महिन्यांपूर्वी ‘इन्स्टाग्राम’वर डेव्हिड विल्यम्स नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाले. काही काळाने दोघांनी आपले मोबाईल नंबर शेअर केले. त्यामुळे मोबाईलवरही त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. यावेळी आरोपीने तो अमेरिकेत कॅप्टन पदावर नोकरीला असल्याचे सांगितले आणि अमेरिकेतून एक गिफ्ट पाठविल्याचेही सांगितले. त्यानंतर महिलेला कस्टममधून बोलत असल्याचा फोन आला.तुम्हाला आलेले महागडे गिफ्ट आले असून ते कस्टमने पकडले आहे. ते सोडवून घेण्यासाठी 70 हजार रुपये ऑनलाइन जमा करण्यास सांगितले. यानंतर महिलेने आरोपी डेव्हिडला फोन करुन याबाबत विचारणा केली. डेव्हिडने होकार दिल्यानंतर महिलेने सांगितलेल्या ठिकाणी 70 हजार रुपये भरले. त्यानंतरदेखील वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने महिलेकडून तब्बल 11 लाख रुपये बॅंकेच्या खात्यावर भरायला लावले. यानंतर मात्र महिलेला संशय आला व तिने सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मुंढव्यातही सायबर चोराने फसवलं पुण्यातील येरवडा परिसराबरोबरच मुंढव्यातही एका सायबर चोराने फसवल्याची घटना घडली आहे. बॅंकेत खातं उघडण्या माहिती घेत असताना सायबर चोरट्याने चालू बॅंक खात्याची गोपनीय़ माहिती घेऊन तब्बल पावणेदोन लाख रुपयांना गंडा घातला आहे. चालू खात्याच्या माहितीबरोबरच या चोरट्याने ग्राहकाकडून ओटीपी क्रमांक घेऊन खात्यातील पावणे दोन लाख रुपये काढून घेतले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cyber crime, Instagram

    पुढील बातम्या