Home /News /maharashtra /

पुणेकरांना दिलासा, ज्या महिलेमुळे पसरली होती भीती तिचाच रिपोर्ट उपचारानंतर आला निगेटिव्ह

पुणेकरांना दिलासा, ज्या महिलेमुळे पसरली होती भीती तिचाच रिपोर्ट उपचारानंतर आला निगेटिव्ह

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा उपचारानंतर आता पुन्हा केलेल्या चाचणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

    पुणे, 31 मार्च : पुणेकरांसाठी आणखी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा उपचारानंतर आता पुन्हा केलेल्या चाचणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आताआणखी एकदा तिची चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतर या महिलेला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. कुठलीही परदेशात जाऊन आल्याची पार्श्वभूमी नसतानाही पुण्यातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन हादरलं होतं. तसंच सामान्य नागरिकांमध्ये हा आजार पसरण्याची मोठी भीती होती. आता तीच महिला बरी झाल्याने मोठा दिलासा आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आले आहे. एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला. कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. आज लॉकडाउनचा 7 वा दिवस आहे, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Pune news

    पुढील बातम्या