• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • काँग्रेसचं धक्कातंत्र : विधानसभा अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?

काँग्रेसचं धक्कातंत्र : विधानसभा अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?

Sangram Thopte for Speaker of the Assembly : विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून एक नाव ठळकपणे समोर आलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 8 मार्च : नाना पटोले (Nana Patole) यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसकडेच हे पद राहणार, हे निश्चित मानलं जात आहे. काँग्रेसने (Congress) अद्याप आपले पत्ते खुले केले नाहीत. मात्र आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून एक नाव ठळकपणे समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावान आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte for Speaker of the Assembly) यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस पक्षातील सूत्रांनी माहिती दिली आहे. राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतरही पुणे जिल्ह्यात काँग्रेसकडून मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. तसंच संग्राम थोपटे हे गेले अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा आणि पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. याच जिल्ह्यात थोपटे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावत ठेवला आहे. त्यामुळे आता निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून देण्यात येणार असल्याची माहिती आहे. हेही वाचा - अर्थसंकल्पावरील टीकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला जोरदार पलटवार विधानसभा अध्यक्षपदासाठी लवकरच संग्राम थोपटे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. संग्राम थोपटे समर्थकांचा राडा आणि दबावतंत्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर हळूहळू मंत्रिपदे जाहीर करण्यात आली. या यादीत संग्राम थोपटे यांचं नाव न आल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यात मोठा राडा केला. थोपटे समर्थकांनी आक्रमक होत थेट पुण्यातील काँग्रेस भवनाचीच तोडफोड केली. त्यामुळे संग्राम थोपटे हे राज्यभरात चर्चेत आले. मात्र त्यावेळी थोपटे यांनी हात झटकत मला या तोडफोडीची माहिती नसल्याची सारवासारव केली होती. या सगळ्या प्रकारातून संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी आपली नाराजी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून दिली. या घटनेला वर्ष लोटल्यानंतर आता थोपटे यांना अखेर काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अद्याप थोपटे यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी या पदावर त्यांचीच नियुक्ती होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published: