Home /News /maharashtra /

पुण्याच्या सफाई कर्मचाऱ्याच्या लेकरांची उपासमार, 3 महिने वेतन नसल्याने घर चालणार कसं?

पुण्याच्या सफाई कर्मचाऱ्याच्या लेकरांची उपासमार, 3 महिने वेतन नसल्याने घर चालणार कसं?

गेल्या 3 महिन्यांपासून या सफाई कर्मचाऱ्याला वेतन मिळालं नाही. मुलांना काय सांगायचं हा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यासमोर उभा राहिला आहे.

  पुणे, 30 मार्च : संपूर्ण देशाला कोरोनाच्या (Coronavirus) संकटाने घेराव घातला आहे. प्रत्येक व्यक्ती हे संकट दूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे. त्यातही वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा देणारे तर तहान-भूक विसरुन काम करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) अधिकृत फेसबुक पेजवर पुण्यातील (Pune) कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कर्वेनगर वॉर्ड ऑफिसमध्ये हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतो. मात्र गेले तीन महिने त्याला वेतनच मिळालं नाहीये. आधीच जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात तब्बल तीन महिने वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्याचे हाल होत आहेत. या कर्मचाऱ्याने घराची अनास्था दाखविणारा एक व्हिडीओ केला आहे. यामध्ये तो म्हणतो, ' घरात अन्नधान्याचा एक कणही शिल्लक राहिला नाही, पगार न झाल्याने हातात पैसे नाहीत, त्यामुळे बाहेरुन काही सामान आणू शकत नाही. आजाराचं सोडा आम्ही भुकेनेच मरु. आमचं म्हणणं ऐका. आमच्यासाठी काहीतरी करा' अशा शब्दात या कर्मचाऱ्याने व्हिडीओत आपल्यी व्यथा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackray) यांनी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शिवाय बाहेर कोरोना (Covid - 19) व्हायरसचा प्रादुर्भाव पसरत असताना ते नेटाने काम करीत आहे. त्यामुळे त्यांचे हाल होणार नाहीत याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आज पुण्यात कोरोनामुळे पहिला बळी झाला आहे. यानंतर पुण्यात नागरिकांनी अधिक सजगतेचे राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Corona virus in india

  पुढील बातम्या