पुणे हादरले; फुटपाथवर झोपणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, डोकं आपटून केली हत्या!

पुणे हादरले; फुटपाथवर झोपणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, डोकं आपटून केली हत्या!

संपूर्ण महाराष्ट्राताल हदरवून सोडणारी घटना पुण्यात घडली आहे.

  • Share this:

पुणे, 27 ऑगस्ट: संपूर्ण महाराष्ट्राताल हदरवून सोडणारी घटना पुण्यात घडली आहे. फुटपाथवर झोपणाऱ्या एका 3 वर्षीय मुलीला उचलून नेण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पीडीत मुलीची हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मालधक्का चौकातून मंगळवारी पहाटे फुटपाथवर झोपणाऱ्या एका 3 वर्षाच्या मुलीला उचलून नेण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर मुलीचे डोक आपटून खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यार्डात थांबलेल्या रेल्वेच्या डब्यात मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि तेथेच डोक आपटून तिची हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडीत मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात रेल्वे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

संबंधित मुलीवर कोणी अत्याचार केला किंवा ते किती जण होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

SPECIAL REPORT : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी, बंडखोरावर भाजपचा डोळा?

Published by: Akshay Shitole
First published: August 27, 2019, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading