मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात रंग लावण्यावरून दोन गटात तुफान राडा, पाहा हा VIDEO

पुण्यात रंग लावण्यावरून दोन गटात तुफान राडा, पाहा हा VIDEO


पुण्यातील चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी भागात दोन गटात भर-रस्त्यावर लाठ्या काठ्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी भागात दोन गटात भर-रस्त्यावर लाठ्या काठ्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी भागात दोन गटात भर-रस्त्यावर लाठ्या काठ्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

पुणे, 10 मार्च : राज्यभरात आज रंगाची उधळण करत मोठ्या उत्साहात पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे खबरदारीने धुलीवंदन साजरा करण्यात आला. परंतु, पुण्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रकरणामुळे आज धुळवडीत रंगाचा बेरंग झाला. रंग खेळण्यावरून झालेल्या वादानंतर दोन गटात तुफान राडा झाला.

पुण्यातील चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी भागात दोन गटात भर-रस्त्यावर लाठ्या काठ्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रंग लावण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला त्यानंतर या दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या काठ्या, बॅटने पाठलाग करून मारहाण केली. हा सगळा प्रकार याच परिसरातील एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  या दोन्ही गटाच्या धुमश्चक्रीत स्थानिक लोकांच्या गाड्यांचीही तोडफोड झाली.

या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.

डॉक्टरांच्या चिट्ठीवरून  हाती लागली कुख्यात टोळी!

दरम्यान, कुलूपबंद दुकानांना टार्गेट करून मुद्देमाल चोरून नेणाऱ्या आंतरराजीय टोळीतील तीन सदस्यांना वर्ध्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदुर भागातील बजरंगपुरा पारधी बेड्यावरून ताब्यात घेत अटक केली. या टोळीतील सदस्य शहराबाहेर आपला डेरा टाकून रेकी करून चोरी करायचं असं पोलिसांच्या तपासात पुढे आलं.

चोरट्याची टोळी ही मध्यप्रदेशातील इंदुर येथील असली तरी या टोळीतील सदस्यांनी गुजरात, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव असा प्रवास करीत वर्धा गाठली. त्यानंतर शहराशेजारी त्यांनी आपला डेरा टाकून मार्केटची रेकी केली. शिवाय मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना टार्गेट करून तेथून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला.

आरोपीत अपालसिंग सोलंकी, धरमसिंग सोलंकी, नागरसाहेब गुज्जर यांचा समावेश आहे. यांनी सराफा व्यावसायिकांचे दोन प्रतिष्ठान तोडून लाखोंचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासून इंदूर गाठले. त्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला दहा दिवस इंदूर परिसरात मुक्काम ठोकावा लागला. मात्र, या पोलिसांनी दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या चिट्ठीवरून माग काढून आरोपीला ताब्यात घेतलं.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत केलेली मोठी कारवाई असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Crime, Pimpari chinchawad, Pune, Pune breaking, Pune news