पानिपतच्या लढाईचं गुढ उकलणार; पुण्यात आढळली चार ऐतिहासिक पत्रे!

पानिपतच्या लढाईचं गुढ उकलणार; पुण्यात आढळली चार ऐतिहासिक पत्रे!

पानिपतच्या लढाईतील मराठा सैन्याचे शौर्य तसंच शाहू काळात असलेलं गावगाड्याचं स्वरूप यावर प्रकाश टाकणार ही चार ऐतिहासिक पत्रं.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे, 8 ऑक्टोबर : पानिपतच्या लढाईतील मराठा सैन्याचे शौर्य तसंच शाहू काळात असलेलं गावगाड्याचं स्वरूप यावर प्रकाश टाकणारी ऐतिहासिक महत्वाची 4 पत्रं आढळली आहेत. पुण्यात वसंत चॅरिटेबल ट्रस्टने पत्रकार परिषद घेऊन ही पत्रे खुली केली आहेत. यामुळे इतिहासाच्या अभ्यासकांना महत्वाचा दस्तऐवज अभ्यासायला मिळणार आहे.

वसंत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घनश्याम ढाणे यांनी ऐतिहासिक घराणी, वतनदार घराणी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडचे ऐतिहासिक कागदपत्रे अभ्यासायला सुरुवात केली आहे. पानिपत लढाईच्या वेळी मराठा सैन्याने अब्दालीच्या फ़ौजेला पळवून लावल्याचं जयाजी शिंदे यांनी लिहिलेलं पत्रं त्यांच्या हाती लागलंय. लवकरच इतिहास संशोधन मंडळात या पत्रांवर विवेचन होणार आहे.

अन्य 3 पत्रातील 2 पत्रे महादजी सालोंखे यांच्या विषयी असून, महादजी यांच्याकडे शाहू छत्रपतींनी आपल्या पत्नी सगुणाबाई यांच्या नावे असलेल्या इनाम जमिनींचा कारभार सोपवला होता त्याविषयी उल्लेख आहे. हा महजर अत्यंत वाचनीय आहे जो 9 फूट 6 इंच लांब आणि 9 इंच रुंद असून या महजरावर नानासाहेब पेशवे आणि श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांच्या मुद्रा आहेत. दुसऱ्या पत्रात शाहू कालीन समाज व्यवस्था, महसूल व्यवस्था यावर भाष्य आहे.

मोडी लिपीतील हे ऐतिहासिक दस्तावेज प्रकाशात आल्याने इतिहासाला चालना मिळणार आहे आणि मराठ्यांची अस्मिता असलेल्या पानिपत लढाईचे अज्ञात पैलू उजेडात येणार असल्याचे इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे म्हणाले.

 VIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही

First published: October 8, 2018, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading