पुणे, 12 मार्च : नीतीमत्ता, प्रामाणिकपणा हे आर्थिक परिस्थितीशी न जोडले जाणारे गुण आहेत. याचाच प्रत्यय पुण्यातील एका घटनेनंतर आला आहे. व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या भारत किसन भोसले यांनी सापडलेलं तब्बल 35 तोळे सोनं परत परत करत प्रामाणिकपणाचं नवं उदाहरणं घालून दिलं आहे.
भारत भोसले हे गेले तीस वर्ष पुण्यात रिक्षा चालवायचा व्यवसाय करतात. 8 मार्चला भोसले पुणे स्टेशनच्या रिक्षा स्टॅंड वर थांबले होते. तब्बल तासभर ते तिथे थांबले. तेव्हा बाजूला एक पिशवी पडलेली होती. कुणा प्रवाशाची असेल म्हणून त्यांनी ती उचलली आणि उघडून पाहिली तर पिशवीत सोन्याच्या दागिण्याचे बॉक्स होते. ते तपासल्यावर त्यात साधारणपणे 35 तोळे सोनं होतं.
एवढं सोनं पाहूनही भारत भोसले यांना त्याचं काही विशेष वाटलं नाही. त्यांनी सरळ ती पिशवी लोहमार्ग पोलिसांकडे नेऊन दिली आणि काही वेळातच तिथे पिशवी हरवल्याची तक्रार करायाला मूळचे कर्नाटक असलेले दिपक नावाचे गृहस्थ हेही पोहोचले. मग बाकीची चौकशी करून पोलिसांनी ते दागिने परत दिले. तेव्हा संबंधित व्यक्तीने देऊ केलेलं बक्षीसही भोसले यांनी घेतलं नाही. कारण त्यांचं म्हणण आहे हे आपलं कामच आहे.
हेही वाचा-शिक्षकांना सहल पडली महागात, 50 पैकी दोघांना कोरोना झाल्याचा संशय
एरवी अनेकदा रिक्षावाल्यांबाबत फार चांगले अनुभव न आल्याने त्यांच्या विषयीची नाराजी सर्रास दिसते. पण भारत भोसलेंसारखे सहृदयी व्यक्ती चांगुलपणावर विश्वास ठेवायला कारणीभूत होतात, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर सर्वत्र उमटत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Auto rickshaw, Pune news, Rikshawala