इलेक्ट्राॅनिक वस्तूंमध्ये लपवलं 3 किलो सोनं, पुणे विमानतळावर जप्त

इलेक्ट्राॅनिक वस्तूंमध्ये लपवलं 3 किलो सोनं, पुणे विमानतळावर जप्त

दुबई-पुणे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या वैयक्तिक झडतीमध्ये हे सोने आढळले.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

11 सप्टेंबर : पुणे विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक  कोटी किंमतीचे तीन किलोपेक्षा अधिक सोने जप्त करण्यात आले आहे.

एअर इंडियाच्या दुबईवरुन येणाऱ्या IX212 या विमानातून आलेल्या इसमाजवळून हे सोने ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये तीन -होडीयम प्लेटेड गोल्ड वायर, सोन्याची सात बिस्कीटे आणि सोन्याच्या 59 प्लेट्स यांचा समावेश असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दुबई-पुणे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या वैयक्तिक झडतीमध्ये हे सोने आढळले. त्याच्याजवळील प्रवाशी बॅगेच्या आतील बाजूस इमर्जन्सी लाईटमध्ये आणि एका डिजिटल अॅम्प्लीफायरमधील ट्रान्सफॉर्मरच्या आतील बाजूस हे सोन लपवून ठेवले होते. हे सोने घेऊन जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने हा गुन्हा कबूल केला असून त्याला अटक करण्यात आली. मुख्य न्यादंडाधिकारी सत्यशीला कटारे यांच्या समोर झालेल्या सुनावनीनंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

First Published: Sep 11, 2017 08:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading