• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचा पक्ष', लेटर बॉम्बमुळे पक्षात खळबळ

'राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचा पक्ष', लेटर बॉम्बमुळे पक्षात खळबळ

'मी पक्षाचा कार्यकर्ता असून मी मांडत असलेली भावना पक्षातील असंख्य लोकांच्या मनात आहे'

 • Share this:
  पुणे, 12 ऑगस्ट : 'राष्ट्रवादीमध्ये आमदार, खासदार, प्रवक्ता, शहर अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलची प्रमुख पद ही फक्त मराठा समाजाला दिली जात आहेत,' असा आरोप करत एक निनावी पत्र व्हायरल झालं आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता असून मी मांडत असलेली भावना पक्षातील असंख्य लोकांच्या मनात आहे, असा दावा पत्र लिहिणाऱ्याने केला आहे. 'एकीकडे शरद पवार नेहमी पक्षात सर्व जातीच्या लोकांना स्थान द्या म्हणजे पक्ष वाढेल, असं म्हणतात. पण दुसरीकडे ही विसंगती समोर येत असल्याने पक्ष एकाच जातीच्या अधिपत्याखाली चालावी अशी पक्षनेतृत्वाची इच्छा आहे की काय,' असा प्रश्नही या निनावी पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. अस्वस्थ कार्यकर्त्यांचे मनोगत, असं म्हणत हे निनावी पत्र झालं आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप 'वंदना चव्हान यांच्या कामामुळे एनजीओ बळकट झाल्या आहेत आणि पक्षसंघटना खिळखिळी झाली आहे. चेतन तुपे यांच्या पार्ट टाईम काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाच्या स्थापनेपासूनच ही सर्वात अयशस्वी कारकीर्द ठरणार आहे. नेत्यांना फसवून तुम्ही यशस्वी व्हाल पण पक्षाचे वाटोळे होणार आहे,' असं म्हणत या पत्राद्वारे राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, या निनावी पत्राबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण या पत्रातील गंभीर आरोपांमुळे पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचं नेतृत्व याबाबत काही कारवाई करणार का, हे पाहावं लागेल. VIDEO : महापूर ओसरल्यानंतरचं भीषण दृष्य, पोल्ट्रीतील हजारो कोंबड्यांना जलसमाधी
  Published by:Akshay Shitole
  First published: