पुणे : लग्नाला नकार दिल्याने प्रियकराचा कापला गळा, रक्ताने माखलेले अवस्थेत पोलिसांना दिली कबुली

पुणे : लग्नाला नकार दिल्याने प्रियकराचा कापला गळा, रक्ताने माखलेले अवस्थेत पोलिसांना दिली कबुली

पहाटे 4.30 च्या सुमारास भररस्त्यात तरुणीने प्रियकराच्या गळ्यावर कोयत्याने वार केले

  • Share this:

पुणे, 3 मार्च : पुण्यात एका प्रेयसीनं प्रियकरांची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे शहरातील नऱ्हे भागातील सिंहगड पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार नऱ्हे गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीनं भररस्त्यात प्रियकाराच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले. यानंतर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रियकराची हत्या केल्यानंतर तरुणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सिंहगड पोलीस ठाण्यात गेली व तेथे तिने आपला गुन्हा कबूल केला.

पहाटे साधारण 4.30 च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. महंतेश बिराजगार (वय 27) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनिता वयवर्ष 25 (नाव बदललेले आहे) हिने आपल्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिता हिला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार अनिता ही पहाटेच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत व हातात कोयता घेऊन सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल झाली. यावेळी तिने 'मी माझ्या प्रियकराचा खून केला' असे सांगितले, यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिता हिला ताब्यात घेतले असून यापुढील तपास सुरू आहे.

First published: March 3, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या