पुण्यात कपड्याच्या आडून ड्रग्जचा व्यवसाय, 88 लाखांचे 'कोकेन' जप्त

पुण्यात कपड्याच्या आडून ड्रग्जचा व्यवसाय, 88 लाखांचे 'कोकेन' जप्त

पुण्याच्या उंद्री परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतून एका नायजेरियन व्यक्तीकडून 88 लाखाचे कोकेन जप्त करण्यात आलं.

  • Share this:

पुणे, 18 जुलै : पुण्याच्या उंद्री परिसरात एका नायजेरियन व्यक्तीकडून 88 लाखाचे कोकेन जप्त करण्यात आलं आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. तसंच याप्रकरणी शोलाडॉये सॅम्युअल जॉय (वय 44)या इसमाला ताब्यात घेतलं आहे.

पुण्याच्या उंद्री परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतून एका नायजेरियन व्यक्तीकडून 88 लाखाचे कोकेन जप्त करण्यात आलं. गेल्या फेब्रुवारी महिन्यात आरोपी बिझनेस व्हीजा घेऊन भारतात आला होता. कपड्यांच्या व्यवसाय करणार असल्याचे त्याने व्हीजा मिळवताना सांगितलं होतं. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत पुणे शहरातील एनआयबीएम रोड, उंद्री या उच्चभ्रू वस्तीत कोकेन विकत असल्याचं त्याने मान्य केलं आहे.

उंद्री परिसरातील कप्स्टोन सोसायटी या उचभ्रू परिसरात तो भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. पोलिसांनी यावेळी त्याच्या ताब्यातून 88 लाख रुपये किमतीचे 733 ग्राम सोने, 3 लाख 68 हजाराची रोख रक्कम, 5 मोबाईल, 3 महागडी घड्याळे असा एकूण 92 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, आरोपनीने हे कोकेन कुठून आणले होते, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र पोलीस आता संबंधित आरोपीची कसून चौकशी करत असून लवकरच याबाबतची संपूर्ण माहिती समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

चाकण हिंसाचार प्रकरणाला नवं वळण, मराठा कार्यकर्त्यांचं अटकसत्र सुरू?

First published: July 18, 2019, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading