कुमार सप्तर्षींच्या 76 व्या वाढदिवशी 50 वी अटक

कुमार सप्तर्षींच्या 76 व्या वाढदिवशी 50 वी अटक

कार्यकर्त्यांनी गुलाबाची फुलं देत,केक कापत "हॅपी बर्थ डे टू यू" म्हणत आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला. कार्यकर्त्यांनी सप्तर्षींना केक भरवला आणि मगच पोलिसांनी अटक केली.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

21 आॅगस्ट : अवघे पाऊणशे वयोमान असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी म्हणजे सळसळता उत्साह...21 ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस...गेल्या वर्षी थाटात अमृत महोत्सव साजरा झाला. आजचा 76 वा वाढदिवस मात्र अनोखा, हाडाच्या कार्यकर्त्याला साजेसा ठरला.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर युक्रांद तर्फे सध्या दर सोमवारी सत्याग्रह आंदोलन सुरू आहे.न्यू कोपरे इथं काही ग्रामस्थांना घरे मिळाली नाहीत म्हणून प्रकल्पाचे विकसक काकडे यांच्या विरोधात सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं.

अटक करायला पोलीस आले तेवढ्यात कार्यकर्त्यांनी गुलाबाची फुलं देत,केक कापत "हॅपी बर्थ डे टू यू" म्हणत आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला. कार्यकर्त्यांनी सप्तर्षींना केक भरवला आणि मगच पोलिसांनी अटक केली.

'सोनू, तुझा आमच्यावर भरोसा नाही का?' या लोकप्रिय गाण्याच्या धर्ती वर "नाना(संजय काकडे) तुमचा भरोसा नाही का ?," हे भन्नाट गाणे यावेळी कार्यकर्त्यानी गायलं. सप्तर्षी यांची ही 50 वी अटक होती.

कार्यकर्त्यांचा हा उत्साह बळ देतो. आम्ही सत्याग्रही मार्गाने जिंकणार,काकडे आमचे शत्रू नाहीत त्यांनाही केक खिलवू म्हणत सप्तर्षी, काकडे पोलीस गाडीत बसून रवाना झाले. एका अनोख्या वाढदिवसाचं साक्षीदार ठरले पोलीस आणि पत्रकार...

सप्तर्षी यांचा उत्साह पाहून तुम्ही वाढदिवस आणि सत्याग्रही अटक याची सेंच्युरी पूर्ण करा अशा शुभेच्छा द्यायचा मोह आवरला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 04:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading