3 दिवसांचं प्लॅनिंग, 40 लाख खर्च करून 5 सेंकदात पाडली भलीमोठी पाण्याची टाकी, पाहा हा पुण्यातला VIDEO

3 दिवसांचं प्लॅनिंग, 40 लाख खर्च करून 5 सेंकदात पाडली भलीमोठी पाण्याची टाकी, पाहा हा पुण्यातला VIDEO

९ जानेवारी रोजी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ठेकेदाराने टाकी पाडण्याच्या कामास सुरुवात केली होती. दोन दिवस जेसीबीने टाकीचे तीन ते चार कॉलम काढण्यात आले त्यामुळे टाकी धोकादायक बनली होती.

  • Share this:

 

पुणे, 13 जानेवारी : तीन दिवस अथक परिश्रमानंतर अखेर खडकी बाजारातील शेवाळे टॉवर जवळ असलेली जुनी पाण्याची टाकी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आली.

९ जानेवारी रोजी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचया ठेकेदाराने टाकी पाडण्याच्या कामास सुरुवात केली होती. दोन दिवस जेसीबीने टाकीचे तीन ते चार कॉलम काढण्यात आले त्यामुळे टाकी धोकादायक बनली होती. कोणत्याही क्षणी टाकी कोसळू शकेल, अशी चर्चा खडकीत रंगली होती.

त्यामुळे परिसरातील रहिवासी चार दिवसांपासून भयभीत झाले होते. अखेर आज टाकी पूर्णपणे पाडण्यात आली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मोठा आवाज होऊन सर्वत्र धुळीमुळे काहीच दिसत नव्हते.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे १९७६ साली ही टाकी खडकीकरांची तहान भागवण्यासाठी बोर्डातर्फे बांधण्यात आली होती. काही वर्षानंतर टाकीतून पाणी झिरपू लागले, त्यावर बोर्डाने अनेकवेळा उपाय करून टाकी गळण्याचे थांबवले होते. मात्र, टाकीचे अनेक ठिकाणी पोपडे निघू लागल्याने बोर्डाने टाकी अर्धवट भरण्याचे सुरू केले आणि खडकीत पाणी टंचाई भासू लागली. त्यानंतर १९९६ साली ही टाकी पूर्णपणे पाणी भरण्यास बंद करण्यात आली.

त्यानंतर नेहरू उद्यान येथील २५ लक्ष लिटर च्या नवीन बनवण्यात आलेल्या टाकीतून खडकीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. १९९६ पासून ही टाकी बंद अवस्थेत होती ती पाडण्यासाठी अनेक वेळा बोर्डाने निविदा मागवल्या होत्या. मात्र, निविदांची रक्कम मोठी असल्यामुळे बोर्डाने अनेक वेळा निविदा फेटाळल्या होत्या. अखेर सर्वात कमी म्हणजेच सुमारे चाळीस लाख रुपयांची निविदा बोर्डाने मंजूर करून शेवटी ही टाकी पाडण्यात आली.

ट्रिपल सीट येणाऱ्या तरुणांनी वाहतूक पोलिसाला उडवलं, धक्कादायक VIDEO

मुंबईत कुलाबा परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांनी ट्रॅफिक कॉन्स्टेबललाच धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

तिन्ही तरुण हे कफ परेड परिसरातले रहिवाशी असून ट्रिपल सीट प्रवास करत होते. तेव्हा रस्त्यावर समोरूनच वाहतूक पोलीस हवालदार शरद नाना पाटील येत होते. अचानक समोरून पोलीस हवालदार येत असल्याचं पाहून मुलांनी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी नाना पाटील यांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, नाना पाटील हे दूर पर्यंत फेकले गेले.

या अपघातात नाना पाटील गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अटक करण्यात आलेले तिन्ही तरुणांची नावं राजेश चव्हाण, आकाश राठोड आणि गोविंद राठोड अशी आहेत. अपघात झालेली बाईकसुद्धा पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Jan 13, 2020 08:48 PM IST

ताज्या बातम्या