कॅन्सरशी लढणाऱ्या सौरवला हवा मदतीचा हात

कॅन्सरशी लढणाऱ्या सौरवला हवा मदतीचा हात

कॅन्सरविरुद्ध मोठ्या हिमतीने लढाई लढणाऱ्या सौरवला उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑक्टोबर : प्रत्येकाचीच करिअरची, भविष्याची काही स्वप्न असतात. शाळेत असताना तुला काय व्हायचंय असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा प्रत्येकाचं स्वतःचं असं उत्तर तयार असतं. पण आपली स्वप्न आणि काळ या दोन गोष्टींची सांगड कधी बसतेच असं नाही. कधी कोणती घटना घडेल आणि पाहिलेली स्वप्न कशी उद्धस्त होतील हे काही सांगता येत नाही. पण त्यातही काही हिरो असे असतात जे मोठ्या हिमतीने या सगळ्यावर मात करण्यासाठी संघर्ष करत असतात. पुणे जिल्ह्यातील 16 वर्षीय सौरव भागवतच्या बाबतीतही काहीसं असंच झालं. वयाच्या 16 व्या वर्षी सौरव रक्ताच्या कॅन्सरशी दोन हात करत आहे.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढणाऱ्या सौरवचं काळीज खूप मोठं आहे. उपचारांना तो चांगला प्रतिसादही देत आहे. 'कॅन्सरला हरवून पुन्हा ही लढाई आपण जिंकू,' असा विश्वास 16 वर्षाय सौरवला आहे. सौरव भागवत याच्यावर सध्या मुंबईतील 'वाडिया हॉस्पिटल'मध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्यावरील उपचारासाठी 22 लाख रुपयांची आवश्यकता आहे. शेतकरी कुटुंबातील सौरवच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. एवढी मोठी रक्कम जमवणं भागवत कुटुंबाला शक्य नाही. त्यामुळे कॅन्सरविरुद्ध लढाई लढणाऱ्या सौरवला उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मदतीसाठी अकाउंट डिटेल :

◾Account Holder : Ms.Pallavi Ankush Bhagwat (सौरवची बहीण)

Name of the bank :Bank of Maharashtra

Account No : 68017142272

IFSC code : MAHB0001830

◾BHIM UPI No : 8830918844

◾Google Pay No : 8830918844

◾Phone Pay (Phonepe) No : 9623110971

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 05:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading