पुण्यात मृत्यूचे तांडव; 15 जण ठार, ही आहेत मृतांची नावे Pune | Compound Wall Collapse | Kondhwa

पुण्यात मृत्यूचे तांडव; 15 जण ठार, ही आहेत मृतांची नावे Pune | Compound Wall Collapse | Kondhwa

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंप जवळ असलेल्या आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

पुणे, 29 जून: पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंप जवळ असलेल्या आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत (compound wall collapse) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. आल्कन स्टायलस सोसायटीच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यावर रात्री दोनच्या सुमारास आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असल्याने खालच्या बाजूला असलेल्या खोल्यांवर भिंतीचा मोठा ढिगारा पडला.

घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेत मृत झालेले सर्व जण मजुर असल्याचे समजते. मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांचे मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पुण्यात मृत्यूचे तांडव; 15 जण ठार, ही आहेत मृतांची नावे

मृतांची नावे

1)आलोक शर्मा -28 वर्षे

2)मोहन शर्मा -20 वर्षे

3)अजय शर्मा -19

4)अभंग शर्मा -19

5)रवि शर्मा -19

6)लक्ष्मीकांत सहानी -33

7)अवधेत सिंह -32

8) सुनील सींग -35

9) ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )

10)सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )

11) विमा दास -28

12) संगीता देवी -26

जखमी :-

1) पूजा देवी -28 वर्षे

'बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना, दोषींवर कडक कारवाई करणार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 07:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading