पुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह

पुण्यामध्ये गेल्या पाच दिवसात तब्बल 7 हत्येच्या घटना घडल्या आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 10:11 PM IST

पुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह

पुणे, 17 जानेवारी : पुण्यात शेजाऱ्यानंच एका 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं खंडणीसाठी 15 वर्षीय निखिल आंग्रोळकरचं अपहरण करून हत्या केली.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निखिल हा त्याचा शेजारी बिनयसिंग राजपूत याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

घटनेच्या दिवशी निखिलने वडिलांना फोन करुन आपल्याला जबरदस्तीने दुचाकीवरुन नेलं जात आल्याचं सांगितलं होतं.

यामुळे आरोपी बिनयसिंग घाबरला आणि त्याने निखिलची हत्या केली. त्यानंतर चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला नेऊन खड्डा खोदला आणि त्यात त्याचा मृतदेह पुरला. निखिलचे वडील अनंत अंग्रोळकर यांच्या तक्रारीनंतर आरोपी  पोलिसांनी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत या तरुणाला अटक केली आहे.

गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

Loading...

पुणे, नाशिक आणि नागपूर ही शहरं सध्या हत्येच्या घटनांनी हादरून गेली आहे. पुण्यामध्ये गेल्या पाच दिवसात तब्बल 7 हत्येच्या घटना घडल्या आहे. तर नाशिकमध्ये एकाच आठवड्यात 3 हत्या झाल्या आहेत तर नागपुरात चक्क पोलिसाच्या मुलानंच दुकानदारावर चाकूने वार केले आहे.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...