आॅल द बेस्ट!, आज बारावीचा निकाल

आॅल द बेस्ट!, आज बारावीचा निकाल

आज 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

  • Share this:

पुणे, 28 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर निश्चित झालीये. आज 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

बारावीचा निकाल कधी लागणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे अफवांना पेव फुटला होता. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद,मुंबई, अमरावती,नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आॅनलाईन पाहता येणार आहे.

मागील वर्षी 30 मे रोजीच बारावीचा निकाल जाहीर झाला होता. या वर्षी निकालाची तारीख 30 मे रोजीच जाहीर होणार आहे.

या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

mahresult.nic.in

mahresult.nic.in

results.nic.in

 

First published: May 29, 2018, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading