पुण्यात गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

पुण्यात गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

ओडिसातील नक्षलग्रस्त भागातून येत असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले

  • Share this:

पुणे, २९ जुलैः पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात येणारा गांजा हा ओडिसातील नक्षलग्रस्त भागातून येत असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. गेल्या आठवड्याभरात पुणे पोलीस आणि नार्कोटिक्स सेलने दिघी आणि हडपसरमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन जण नक्षलग्रस्त भागातले असून रेल्वेतून तस्करी करून गांजा पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ११० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा नेमका कुठून येतो याची चौकशी केल्यानंतर ओरिसामधल्या नक्षलग्रस्त भागामध्ये या गांजाची शेती केली जाते. रेल्वेमधून गांजाची तस्करी करून नक्षलवादी पैसे कमावतात, अशी माहिती पंकज डहाणे, उपायुक्त गुन्हे शाखा यांनी दिली. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये गांज्याची तस्करी वाढली आहे.

२०१५  मध्ये गांजा तस्करीच्या १७ प्रकरणांमध्ये ३४ अटक तर २५९ किलो गांजा जप्त

२०१६ मध्ये गांजा तस्करीच्या ३९ प्रकरणांमध्ये ४८ अटक तर १४४ किलो गांजा जप्त

२०१७ मध्ये गांजा तस्करीच्या ५३ प्रकरणांमध्ये ७० अटक तर ४७४ किलो गांजा जप्त

२०१८ जूनपर्यंत गांजा तस्करीच्या २१ प्रकरणांमध्ये २४ अटक तर १६४ किलो गांजा जप्त

हेही वाचा-

PHOTOS : अपघातापूर्वीचे अखेरचे 'ते' बसमधील फोटो

आयोगाच्या इशार्‍यानंतर ममतादीदींचा विरोध मावळला 

मुस्लिमांनी आरक्षण मागितलं तर काय चुकलं? - ओवेसी 

गुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार 

अबब! जळगावातला अनोखा गोबर स्नान महोत्सव 

First published: July 29, 2018, 9:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading