Pulwama: दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील- PM मोदी

Pulwama: दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील- PM मोदी

दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे.

  • Share this:

यवतमाळ, 16 फेब्रुवारी: भारताच्या फाळणीनंतर जन्माला आलेला पाकिस्तान हा देश म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातील भारताच्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे.

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा जनतेमधील आक्रोश मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास ठेवा. शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ज्यांनी हा हल्ला केला द्यांना जरूर शिक्षा दिली जाईल, असे देखील मोदींनी सांगितले.

अपडेट

- गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांचा मोदींच्या हस्ते सन्मान

- हम सफर एक्सप्रेसला मोदींनी हिरवा झेंडा, नागपूरमधील अजनी स्थानकावरून गाडी रवाना

- टेलरिंग कामाचे प्रशिक्षण करणाऱ्या मुलींना मुद्रा कर्ज वाटप

- पांढरकवडामधील भूमीत संतांना प्रणाम

- शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही, हे मी पुन्हा सांगतो

- पुलवामाच्या घटनेबद्दलचा जनतेचा आक्रोश मी समजू शकते

- पुलवामामध्ये ज्यांनी हल्ला केला त्यांना शिक्षा दिली जाईल

- भारतीय लष्कराला पूर्ण स्वतंत्र्य दिले

- फाळणीनंतर निर्मीती झालेल्या पाकिस्तान हा देश दहशतवादीचे दुसरे नाव झाला आहे.

- जवानांवर विश्वास ठेवा,

- दहशतवाद्यांना कोण मारणार, कधी मारणार, केव्हा मारणार हे जवानच ठरवतील

संबंधित बातम्या-

pulwama attack : 7 संशयित ताब्यात, एका स्थानिकाचा शोध सुरू

Pulwama हल्ल्याच्या निषेधार्थ थांबवली मुंबईची लाईफ लाईन, नालासोपाऱ्यात प्रवाशांचा उद्रेक

First published: February 16, 2019, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading