प्रवीण मुधोळकर, नागपूर, 23 फेब्रुवारी : शहीद जवानांच्या नावानं आणि देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करू नका, असं सांगणाऱ्या भाजपकडूनच नागपुरात पोस्टरबाजी सुरू आहे. पाकला जाणारं पाणी अडवण्याची घोषणा करणाऱ्या गडकरींचं अभिनंदन करणारे पोस्टर शहरात झळकत आहेत. आपल्या वाट्याचं पाणी अडवल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन या पोस्टरमधून करण्यात येत आहे. संघ मुख्यालय परिसरातही हे पोस्टर लागले आहेत.