धुळे, 16 फेब्रुवारी: पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक अश्रूच्या बदला घेतला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिले. धुळ्याच्या गोशाळा मैदानात एका सभेत ते बोलत होते.
भारत हा नव्या धोरणांचा आणि नवी नीती देश आहे. याचा अनुभव लवकरच जगाला देखील येईल. ज्यांनी गोळया चावल्या, बॉम्ब फेकले अथवा ज्यांनी इतरांच्या हातात बंदूका दिल्या वा बॉम्ब दिले यांच्यापैकी कोणालाच भारताचा जवान सोडणार नाही. भारतावर हल्ला करणाऱ्या कोणालाही जवान स्वस्थ बसू देणार नाहीत. भारताचे हे धोरण राहिलेले आहे की आपण कोणाला त्रास देत नाही. पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, नव्या भारताला कोणी त्रास दिला तर अशा शत्रूला भारत सोडणार देखील नाही, असे पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले.
हे देखील वाचा: Pulwama Attack :'मुस्लिम बटालियन तयार करा आणि सीमेवर पाठवा'
दुसऱ्या सर्जिकल स्टाईकचा इशारा
भारतीय जवानांनी याआधी शत्रूला धडा शिकवला आहे आणि यावेळी देखील असा धडा शिकवण्यास कोणतीही गय केली जाणार नाही.
दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील- PM मोदी
भारताच्या फाळणीनंतर जन्माला आलेला पाकिस्तान हा देश म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातील भारताच्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे.
हे देखील वाचा-Pulwama : PM मोदींच्या 'या' पाच विधानांमुळे पाकला भरली धडकी
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा जनतेमधील आक्रोश मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास ठेवा. शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ज्यांनी हा हल्ला केला द्यांना जरूर शिक्षा दिली जाईल, असे देखील मोदींनी सांगितले.
VIDEO : आधीही करून दाखवलं आणि आताही कोणतीही कसर सोडणार नाही, मोदींचं UNCUT भाषण