Home /News /maharashtra /

भाजपची माघार, पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीत विश्वजीत कदमांची बिनविरोध निवड

भाजपची माघार, पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीत विश्वजीत कदमांची बिनविरोध निवड

एखाद्या नेत्याच्या निधनानंतर, तेथील पोटनिवडणुकीत भाजपा कधी निवडणूक लढवत नाही. त्यामुळे भाजप या ठिकाणी अर्ज मागे घेत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं.

सांगली, 14 मे : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड झालीये  भाजपकडून संग्राम सिंग देशमुखांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस उमेदावाराची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस कडेगाव विधानसभेची जागा रिक्त झाली होती. काँग्रेसकडून त्यांचा मुलगा विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत हजर होते. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर केलं. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर, तेथील पोटनिवडणुकीत भाजपा कधी निवडणूक लढवत नाही.  त्यामुळे भाजप या ठिकाणी अर्ज मागे घेत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेमुळे पोटनिवडणूक बिनविरोध झाली.  विश्वजित कदम बिनविरोध निवडणूक आले. या निवडीसह काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्ष नेते पद कायम राहणार आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेतेपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कायम राहील. विखे पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्नेहपूर्ण संबंध राजकीय वर्तुळात कायम चर्चेचा विषय असतो. एका मताने विधानसभेत काँग्रेस आमदार संख्याबळ जास्त झाले आहे.
First published:

Tags: BJP, Sangali, Vishwajit kadam, चंद्रकांत पाटील, पलूस-कडेगाव पोटनिवडणूक, विश्वजित कदम

पुढील बातम्या