Eng vs Aus सामन्यावर सट्टा लावणाऱ्या PSI च्या हातात बेड्या, दादरमधील कारवाई

Eng vs Aus सामन्यावर सट्टा लावणाऱ्या PSI च्या हातात बेड्या, दादरमधील कारवाई

विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) रंगेहात अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून- विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) रंगेहात अटक करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ज्ञानेश्वर खरमाटे असे आरोपी पीएसआयचे नाव असून त्याच्यासह दोघांना पोलिसांनी दादरमधील एका हॉटेलमधून अटक केली आहे.

ज्ञानेश्वर खरमाटे हा भायखळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. या कारवाईनंतर त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे प्रत्येक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे.

मिकीन शहा नावाचा व्यक्ती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर फोनवरुन बेटिंग लावत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस पथकाने दादरमधील एका हॉटेलवर धाड टाकली. यात दोन जण सट्टा खेळताना आढळून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. यावेळी पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे हा देखील तिथेच होता. मिकीन शहा आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे याला अटक करण्यात आली. आरोपींकडून 1 लाख 93 हजार 200 रुपये रोख आणि सहा मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता सगळ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

10 रुपयांसाठी मुंबईत हत्या..

दादरमध्ये अवघ्या 10 रुपयांच्या वादातून भाजी विक्रेत्याने एका ग्राहकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी भाजी विक्रेता सोनीलाल सुखदेव महंतो (वय-25) याला अटक केली आहे. हनीफ मोहम्मद सिद्दीकी (वय-35) असे मृत ग्राहकाचे नाव आहे.

VIDEO:सावधान! शाळेत जाताना तुमची मुलं तर करत नाहीये ना असा प्रवास?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading