मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमरावती हादरलं, रस्त्याच्या कडेला गळफास घेऊन पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

अमरावती हादरलं, रस्त्याच्या कडेला गळफास घेऊन पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

ते गेल्या सहा महिन्यांपासून ड्युटीवर सातत्याने गैरहजर होते तसंच मानसिक तणावात असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.

ते गेल्या सहा महिन्यांपासून ड्युटीवर सातत्याने गैरहजर होते तसंच मानसिक तणावात असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.

ते गेल्या सहा महिन्यांपासून ड्युटीवर सातत्याने गैरहजर होते तसंच मानसिक तणावात असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.

अमरावती, 13 ऑगस्ट : अमरावतीच्या (amravati) फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ( fejarpura police station) PSI पदावर कार्यरत पोलीस अधिकारी अनिल मुळे (psi anil mule committed suicide) यांनी आज दिवसाढवळ्या गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात गुरुवारीच दोन हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आज पोलीस अधिकारी PSI अनिल मुळे यांच्या आत्महत्येने शहर हादरून गेलं आहे.  अनिल मुळे हे कठोरा रहाटगाव, रिंग रोड परिसरात आकार अपार्टमेंट येथे वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरापासून गोल्डन लिफ मंगल कार्यालयासमोरील लेआऊट मधील निंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन यात्रा संपविली घेतली.

धुळ्याला जाण्यासाठी uber कार बुक केली, चालकाला संपवले पण fastag ने अडकवले!

आत्महत्येचं नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस तपास करीत आहेत. अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे तर आता फ्रेजरपुरा येथे कार्यरत होते.

ते गेल्या सहा महिन्यांपासून ड्युटीवर सातत्याने गैरहजर होते तसंच मानसिक तणावात असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. पंडित अनिल मोरे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्त आरती सिंग, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव सहाय्यक, पोलीस आयुक्त भारत गायकवाड, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

लस घ्या आणि मालामाल व्हा! Vaccination नंतर Amazon कडून मिळणार कॅश, जाणून घ्या

अनिल मोरे यांची कार आत्महत्या केली त्या घटनास्थळापासून अवघ्या 50 फूट अंतरावर उभी होती तसंच त्यांच्या चार चाकीची चावी त्यांच्या खिशाला अडकवलेली दिसली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:
top videos